खा. संजय मंडलिक यांनी घेतली डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक यांनी शुक्रवारी दैनिक ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच मंडलिक घराण्याबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांना आपण मोलाची साथ दिली तसेच सहकार्य मला गेल्यावेळी मिळाले. आताही लोकांचा कौल आजमावत असताना आपल्या आशीर्वादाची गरज असल्याचे संजय मंडलिक यांनी आवर्जुन सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा खा. मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर खा. मंडलिक यांनी शुक्रवारी डॉ. जाधव यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
दरम्यान, खा. संजय मंडलिक यांनी दै. ‘Bharat Live News Media’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी विजय अग्रवाल, राजू दलवाई, माजी नगरसेवक रमेश पुरेकर उपस्थित होते.
Latest Marathi News खा. संजय मंडलिक यांनी घेतली डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.
