पुणे : महापालिकेच्या तिजोरीत 7463 कोटी जमा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी आणि जीएसटीच्या माध्यमातून 7 हजार 463 कोटींचा कर जमा झाला आहे. हा कर 28 मार्चपर्यंत जमा झालेला असून, आणखी दोन दिवस म्हणजेच 31 मार्चपर्यंत यामध्ये भर पडणार आहे.? महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळतो. मात्र, 90 ते 95 टक्के … The post पुणे : महापालिकेच्या तिजोरीत 7463 कोटी जमा.. appeared first on पुढारी.

पुणे : महापालिकेच्या तिजोरीत 7463 कोटी जमा..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी आणि जीएसटीच्या माध्यमातून 7 हजार 463 कोटींचा कर जमा झाला आहे. हा कर 28 मार्चपर्यंत जमा झालेला असून, आणखी दोन दिवस म्हणजेच 31 मार्चपर्यंत यामध्ये भर पडणार आहे.? महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळतो. मात्र, 90 ते 95 टक्के निधी हा महापालिका विविध कर व शुल्कामधून खर्च केला जातो. शहरीकरणामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्चाचा आलेख दरवर्षी चढत्या क्रमाने वाढत आहे. दुसरीकडे जमा-खर्चातील तफावत वाढताना दिसते.
2023-24 चे अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटींचे सादर करण्यात आले. यामध्ये एलबीटी अनुदान 455.31 कोटी, जीएसटी अनुदान 2316.31 कोटी, मिळकतकर 2318.15 कोटी, विकास (बांधकाम शुल्क) 1804.83 कोटी, पाणीपट्टी 509.73 कोटी, शासकीय अनुदान 541.82 कोटी, इतर जमा 957.28 कोटी, कर्जरोखे 400 कोटी आणि प्रधानमंत्री आवास योजना 201.54 कोटी गृहीत धरण्यात आले.
प्रत्यक्षात मात्र 28 मार्चपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 7 हजार 463 कोटी जमा झाले. दरम्यान, सलग तीन दिवस शासकीय सुट्या आल्याने गुरुवारी (दि. 28) एका दिवसात तब्बल 18 कोटी 10 लाख 32 हजार 672 रुपये मिळकतकर जमा झाला.
बांधकाम शुल्कातून 2 हजार 200 कोटी 89 लाख रुपये जमा
महापालिका हद्दीतील बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणार्‍या शुल्कातून 1 एप्रिल 2023 पासून 28 मार्च 2024 पर्यंत 2 हजार 200 कोटी 89 लाख रुपये मिळाले असून, एकूण उद्दिष्टाच्या हे उत्पन्न 137.14 टक्के इतके आहे. सन 2023-24 साठी बांधकाम शुल्कातून महापालिकेने 1 हजार 604 कोटी 84 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवले होते.
मिळकतकरापोटी 2 हजार 191 कोटी 75 लाख
महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकरापोटी 1 एप्रिल 2023 ते 28 मार्च 2024 पर्यंत 2 हजार 191 कोटी 75 लाख 19 हजार 629 रुपये जमा झाले आहेत. गतवर्षी 1 हजार 868 कोटी 44 लाख 13 हजार 783 रुपये जमा झाले होते. या तुलनेत चालू आर्थिक वर्षात 323 कोटी 31 लाख 5 हजार 846 रुपये अधिकचे जमा झाले आहेत. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या (सन 2024-25) महापालिकेने मिळकतकरातून महापालिकेच्या तिजोरीत 2 हजार 400 कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा

Lok Sabha Election-2024 : प्रकाश आंबेडकर तिसर्‍या आघाडीच्या तयारीत
शाहू महाराजांना संधिसाधूंनी निवडणुकीत उतरवले : पालकमंत्री हसन मुश्रीफ
नागपूर : रामटेक मतदारसंघात आज कुणाची माघार? सर्वांचे लक्ष

Latest Marathi News पुणे : महापालिकेच्या तिजोरीत 7463 कोटी जमा.. Brought to You By : Bharat Live News Media.