काँग्रेसला १,८२३ कोटींच्या आयकर वसुलीची नोटीस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि भाकपला आयकर खात्याने जबर झटका दिला आहे. काँग्रेसला 1,823 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे, तर भाकपलाही 11 कोटींचा भरणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. हा कर दहशतवाद असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. आयकर खात्याच्या कारवाईला आव्हान देणारी … The post काँग्रेसला १,८२३ कोटींच्या आयकर वसुलीची नोटीस appeared first on पुढारी.

काँग्रेसला १,८२३ कोटींच्या आयकर वसुलीची नोटीस

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस आणि भाकपला आयकर खात्याने जबर झटका दिला आहे. काँग्रेसला 1,823 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे, तर भाकपलाही 11 कोटींचा भरणा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. हा कर दहशतवाद असल्याचा आरोप करीत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे.
आयकर खात्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही तासांतच आयकर खात्याने काँग्रेसला दंड व व्याज असे मिळून एकूण 1,823 कोटी रुपये भरण्याबाबत नोटीस काढली आहे. या नोटिसीत 2017-18 ते 2020-21 या कालावधीतील आयकर भरण्यातील त्रुटींचा उल्लेख केला आहे. याआधी आयकर खात्याने काँग्रेसला 200 कोटी रुपये दंड आकारत काँग्रेसची बँक खाती सील केली होती.
आजच्या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणाले की, मोदी सरकारचा हा कर दहशतवाद असून, या प्रकरणात उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी आहे. जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्यासाठी अशा नोटिसा पाठवण्यात येत आहेत. हा एकप्रकारे काँग्रेसवर हल्लाच आहे.
अजय माकन म्हणाले की, भाजपवरही 4,600 कोटी रुपयांचा दंड आकारण्याची गरज आहे. आयकर विभागाने या वसुलीसाठी भाजपला नोटीस बजावायला हवी. काँग्रेसला 1993-94 पासून सीताराम केसरी यांच्या काळापासून नोटिसा बजावण्यात येत आहेत. केसरी यांच्या काळापासून 53 कोटी रुपये भरण्याची मागणी करण्यात येत आहे. आयकर खात्याने काँग्रेसकडून एकूण 1,823 कोटी रुपयांची वसुली केली आहे. 1,800 कोटी ही छोटी रक्कम नाही. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचा खर्च 800 कोटी रुपये होता.
Latest Marathi News काँग्रेसला १,८२३ कोटींच्या आयकर वसुलीची नोटीस Brought to You By : Bharat Live News Media.