सीईटीच्या वेळापत्रकात मोठा बदल; ‘असे’ असेल सुधारित वेळापत्रक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पहिल्यांदा वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. सुधारित वेळापत्रकात एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) … The post सीईटीच्या वेळापत्रकात मोठा बदल; ‘असे’ असेल सुधारित वेळापत्रक appeared first on पुढारी.
सीईटीच्या वेळापत्रकात मोठा बदल; ‘असे’ असेल सुधारित वेळापत्रक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पहिल्यांदा वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. सुधारित वेळापत्रकात एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटांतील परीक्षा 5 मे रोजी होणार होती. मात्र, त्याच दिवशी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) होणार असल्याने ते वेळापत्रक बदलून त्या दिवशी परीक्षाच न ठेवण्याचा बदल करावा लागला. त्यानंतर आता तिसर्‍यांदा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा 22, 23, 24, 28, 29 आणि 30 एप्रिल रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटाची परीक्षा 2, 3, 4, 9, 10, 11, 15, 16, 17 मे रोजी होणार आहे. उपयोजित कला अभ्यासक्रम सीईटी 12 मे रोजी, बीए-बीएस्सी बीएड चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी 18 मे रोजी, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी 18 मे, नर्सिंग सीईटी 24 आणि 25 मे, हॉटेल मॅनेजमेंट पदवी सीईटी 22 मे, बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीए सीईटी 27 ते 29 मे रोजी होणार आहे.
हेही वाचा

कृत्रिम रंग वापरताय? वेळीच सावध व्हा
कोल्हापूर : हजगोळी येथील वृद्धाची गळा चिरून हत्या; मृतदेह नदीत आढळला
बीड: खोकरमोह येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले

Latest Marathi News सीईटीच्या वेळापत्रकात मोठा बदल; ‘असे’ असेल सुधारित वेळापत्रक Brought to You By : Bharat Live News Media.