यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : वर्चस्ववादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात अनेक जण जखमी झाले असून हवेत गोळीबार झाल्यामुळे परिसर हादरला आहे. महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीसह २० ते … The post यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी appeared first on पुढारी.

यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्चस्ववादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात अनेक जण जखमी झाले असून हवेत गोळीबार झाल्यामुळे परिसर हादरला आहे. महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार राउंड रिकामे, तर दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीसह २० ते २५ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
मुख्य आरोपी अंजुम लाला यांनी फिर्यादीला घटनास्थळावर दमदाटी करून मारहाण केली व त्यांच्या दिशेने राउंड फायर केल्याची तक्रार सुरेश ऊर्फ कृष्णा ढाले यांनी महागाव पोलिसांत दाखल केली. या तक्रारीवरून अंजूम लाला व २० ते २५ जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी पहाटे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळावरून एक कार, सहा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा :

Nanded News : वाळू माफियाच्या दोन गटात तुफान गोळीबार; २५ जणांवर गुन्हा दाखल, ४ जणांना अटक
कोल्हापूर : हजगोळी येथील वृद्धाची गळा चिरून हत्या; मृतदेह नदीत आढळला
हिंगोली : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारसह १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News यवतमाळ : रेती घाटावर तुंबळ हाणामारी; हवेत गोळीबार, अनेक जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.