Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारणार्‍या कारचालकाला गाडी साईडला घेण्यास लावून चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वादोन वाजता घडला. साहिल सुनील गोडांबे (वय 21), योगेश लक्ष्मण जानकर (वय 27, दोघे रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. … The post Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट appeared first on पुढारी.
#image_title

Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारणार्‍या कारचालकाला गाडी साईडला घेण्यास लावून चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वादोन वाजता घडला. साहिल सुनील गोडांबे (वय 21), योगेश लक्ष्मण जानकर (वय 27, दोघे रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मांजरी येथील एका 32 वर्षांच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार घेऊन जात होते. त्यांना पत्ता माहिती नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसून माझा भाऊ येणार आहे, थोडीशी गाडी साईडला घेऊन बाजूला थांब, असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी बाजूला थांबले. काही वेळात एक जण मोटारसायकलवरून आला.
त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांच्याकडून 3 हजार 300 रुपये जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. त्यांच्याकडील चाकू पाहून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.
हेही वाचा
‘ही’ नदी प्रदान करते पवित्र शाळीग्राम
Pune News : साखर संकुल परिसरातच होणार सहकार आयुक्तालय
Pune News : राज्यात प्लास्टिकच्या फुलांवरही हवी बंदी; आ. अशोक पवार
 
The post Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्ता विचारणार्‍या कारचालकाला गाडी साईडला घेण्यास लावून चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वादोन वाजता घडला. साहिल सुनील गोडांबे (वय 21), योगेश लक्ष्मण जानकर (वय 27, दोघे रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. …

The post Crime News : पत्ता विचारणे पडले महागात, चाकूचा धाक दाखवून लुट appeared first on पुढारी.

Go to Source