पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला

इंदिरानगर : Bharat Live News Media वृत्तसेवा- पाथर्डी परिसर व पिंपळगाव खांब परिसरात ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणारा व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आठ ते नऊ वर्षाचा (नर) हा बिबट्या आहे. (Nashik Leopard News)
मागील काही महिन्यांपासून पाथर्डी परिसर, पिंपळगाव खांब परिसरात बिबट्याने मळयाधारकांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे व दहशतीचे वातावरण पसरवले होते. अधून मधून हा बिबट्या दिसायचा तर काही वेळेला याने मुक्या प्राण्यांवर हल्ला सुद्धा केला होता. त्यामुळे चिंतीत झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवले होते. वनविभागाने ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बिबट्याच्या ठशाचे नमुने घेत सुखदेव पोरजे यांच्या मळ्यामध्ये पिंजरा लावला होता. अखेर आज लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. भक्षाच्या व पाण्याच्या शोधात बिबटे या परिसरामध्ये नेहमीच आढळून येत असतात. बिबट्याला पकडण्याचे समजताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व वनविभागाचे कौतुक केले. नाशिक पश्चिम वन विभागाचे वन संरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे यांनी बिबट्याला जेरबंद केले.
अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला वन विभागाकडून जेरबंद करण्यात यश आले आहे. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद केल्याने वनविभागाचे कौतुकच आहे. यापुढेही अशा प्रकारचे सहकार्य वनविभागाकडून मिळेल.- त्र्यंबक कोंबडे, शेतकरी व उबाठा शिवसेना विभाग प्रमुख.
हेही वाचा :
Jalgaon Crime | नशिराबादला ५८ लाखाचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त
Dhule News | कुडाशी शिवारात 16 कृषिपंप चोरीला; शेतकरी त्रस्त, चोर मस्त, पोलिस मात्र सुस्त
भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी मराठा समाज आक्रमक, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर
Latest Marathi News पाथर्डीसह पिंपळगाव खांब परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला Brought to You By : Bharat Live News Media.
