अकोला: कवठा -पुंडा मार्गावर अनैतिक प्रेमसंबंधातून खून: १२ तासांत आरोपी गजाआड

अकोला, पुढारी वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कवठा ते पुंडा मार्गावर अपघात झाल्याचा बनाव पोलिसांनी उधळून लावला. तर अनैतिक प्रेमसंबंधातून खून झाल्याची उकल पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपींना गजाआड केले आहे. कवठा-पुंडा मार्गावर दुचाकीचा अपघात झाल्याने एक जण पडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना  घटनास्थळावर गेल्यावर हा अपघात नसून घातपात असल्याची शंका आली. … The post अकोला: कवठा -पुंडा मार्गावर अनैतिक प्रेमसंबंधातून खून: १२ तासांत आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

अकोला: कवठा -पुंडा मार्गावर अनैतिक प्रेमसंबंधातून खून: १२ तासांत आरोपी गजाआड

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कवठा ते पुंडा मार्गावर अपघात झाल्याचा बनाव पोलिसांनी उधळून लावला. तर अनैतिक प्रेमसंबंधातून खून झाल्याची उकल पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपींना गजाआड केले आहे. कवठा-पुंडा मार्गावर दुचाकीचा अपघात झाल्याने एक जण पडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना  घटनास्थळावर गेल्यावर हा अपघात नसून घातपात असल्याची शंका आली. Akola News

सीसीटीव्ही  फुटेज आणि  तांत्रिक तपासाच्या साहाय्याने हा अपघात नसून, हत्येचा गुन्हा असल्याची उकल पोलिसांनी केली. पोलीस सूत्रानुसार  जिवा कारंडे (वय, ३४) याची पत्नी व लक्ष्मण यादुबा कोळपे (३५, रा. राजुरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, खान्देश) याचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याने कारंडे हा अडसर ठरत होता. त्यामुळे लक्ष्मण कोळपे व त्याचा  कामगार  संतोष अर्जुन कोरडकर (२४, रा. कुन्हा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, खान्देश) यांनी संगनमत करून जिवा कारंडे याचा गळा आवळून  त्याच्या दाढीवर, गालावर, नाकावर कोणत्या तरी वस्तूच्या साहाय्याने आघात व मारहाण करून त्यास ठार मारले.  व रस्त्याच्या कडेला सोडून दिले असावे किंवा टाकून पळून गेले असावे, असे तपासात निष्पन्न झाले.  Akola News

या घटनेच्या फिर्यादीवरून अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
तपास चक्रे फिरवून पोलिसांनी गुन्ह्यातील फरार आरोपी लक्ष्मण यादुबा कोळपे, संतोष अर्जुन कोरडकर यांना अटक केली आहे.

हेही वाचा 

अकोला: बोर्डी येथे शेतमजुराचा भिंती कोसळून मृत्यू
अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार
अकोला : तापमानाने गाठला  40 डिग्री सेल्सिअस चा आकडा  

Latest Marathi News अकोला: कवठा -पुंडा मार्गावर अनैतिक प्रेमसंबंधातून खून: १२ तासांत आरोपी गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.