सातारा : श्रीनिवास पाटील यांची माघार! ‘लोकसभा’ लढण्यास नकार

सातारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघाची राज्यभर चर्चा सुरू आहे. महायुतीकडून विद्यमान राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दरम्यान, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. शुक्रवारी शरद पवार यांनी साताऱ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीतून एक मोठी बातमी समोर आली. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आरोग्याचे कारण देत पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. यामुळे आता शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Latest Marathi News सातारा : श्रीनिवास पाटील यांची माघार! ‘लोकसभा’ लढण्यास नकार Brought to You By : Bharat Live News Media.
