जळगावात ५८ लाखाचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त

जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद येथे उमाळा … The post जळगावात ५८ लाखाचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त appeared first on पुढारी.

जळगावात ५८ लाखाचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त

जळगाव- तालुक्यातील नशिराबाद येथील गोडावूनवर अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद येथे उमाळा रोडवर गट नंबर २० येथील एका गोडावूनमध्ये बेकादेशीररित्या सुगंधित पान मसाला, गुटखा, तंबाखू यांची साठवणूक करून विक्रीसाठी आणत असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्यासह पथकाने नशिराबाद पोलीसांच्या मदतीने २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता नशिराबाद गावातील गट नंबर २० मधील एका गोडावूनवर छापा टाकला. या कारवाईत पथकाने एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिथुन कुमार श्याम भूषण सहानी वय २०, अजय कुमार कापुरी सहानी वय-१८ दोन्ही रा. किशन वाडा, ट्रक चालक अब्दुल जहीर खान रा. मध्य प्रदेश, बलवीर सिंग बग्गा रा. इंदोर, मध्य प्रदेश, गोडावून मालक आणि एकावर (पुर्ण नाव माहित नाही) अशा ६ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मिथुन कुमार सहानी आणि अजयकुमार सहानी या दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायतळ हे करीत आहे.
हेही वाचा :

Bihar Lok Sabha Election: इंडिया आघाडीचे बिहारमधील जागावाटपाचे सूत्र ठरले!, राजद २६ तर काँग्रेस ९ जागांवर लढणार
Mukhtar Ansari Death : मुख्तार अन्सारीला तुरूंगात जेवणातून विष दिले?: मुलाच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश
धुळ्याची जागा काँग्रेसला सोडल्याने पक्षाकडून प्रबळ उमेदवाराचा होतोय शोध

Latest Marathi News जळगावात ५८ लाखाचा गुटखा व सुगंधित पान मसाला जप्त Brought to You By : Bharat Live News Media.