कोल्हापूर : गणेशमूर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटून कामगार ठार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संत गोरा कुंभार वसाहत येथे गणपतीची मूर्ती चौथ्या मजल्यावरुन खाली आणताना लिफ्टची रोपवे वायर   तुटली. या दुर्घटनेत खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२९) सकाळी ११च्या सुमारास घडली. भगवान नामदेव कांबळे (वय ४८, रा. विक्रमनगर, मूळ गाव पासार्डे, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर … The post कोल्हापूर : गणेशमूर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटून कामगार ठार appeared first on पुढारी.

कोल्हापूर : गणेशमूर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटून कामगार ठार

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : संत गोरा कुंभार वसाहत येथे गणपतीची मूर्ती चौथ्या मजल्यावरुन खाली आणताना लिफ्टची रोपवे वायर   तुटली. या दुर्घटनेत खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२९) सकाळी ११च्या सुमारास घडली. भगवान नामदेव कांबळे (वय ४८, रा. विक्रमनगर, मूळ गाव पासार्डे, ता. करवीर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे. Kolhapur News
याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान कांबळे संत गोरा कुंभार येथे गेल्या दोन महिन्यांपासून बाजीराव कुंभार यांच्याकडे काम करीत होता. आज सकाळी अकराच्या सुमारास तो आणि गुहागर येथील कामगार चौथ्या मजल्यावरून लिफ्टमधून गणपतीची मूर्ती खाली आणत होते. यावेळी लिफ्टची वायर तुटल्याने लिफ्टमधून ते दोघे खाली पडले. त्यांना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.Kolhapur News
भगवान याची मुलगी दहावीत शिकत आहे, तर मुलगा पहिलीत शिकत आहे. त्याला तीन भाऊ आणि एक बहिण आहे. भगवान याला भजनाचा छंद असून ते साई भजनी मंडळात होते. त्याच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा 

कोल्हापूर लोकसभा निवडणूक : खासबाग मैदानात हलगीचा कडकडाट!
कोल्हापूर : दोन हजार दुकानगाळ्यांचा प्रश्न वादग्रस्त
Lok Sabha Election 2024 | कोल्हापूर : लाल झेंडा, काँग्रेसचा तिरंगा ते भगवा

Latest Marathi News कोल्हापूर : गणेशमूर्ती खाली आणताना लिफ्टची वायर तुटून कामगार ठार Brought to You By : Bharat Live News Media.