प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची घुटमळ

धुळे : पुढारी ऑनलाइन डेस्क धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्यावर भाजपकडून लागोपाठ तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. तर महाविकास आघाडीत मात्र अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपला पुढील रणनीती आखता आलेली नाही. धुळे लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली … The post प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची घुटमळ appeared first on पुढारी.

प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची घुटमळ

धुळे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्यावर भाजपकडून लागोपाठ तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. तर महाविकास आघाडीत मात्र अजूनही उमेदवार निश्चित झालेला नाही. उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपला पुढील रणनीती आखता आलेली नाही. धुळे लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. परंतु अद्यापतरी प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेस घुटमळ होत आहे.
काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे देखील नाव पुढे आले आहे. खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान धुळे येथे महिलांसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे हेदेखील उमेदवारीच्या स्पर्धत आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर हे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी पराभूत झाले होते. धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप तसेच काँग्रेसचे उमेदवार हे धुळे जिल्ह्यातील होते. भाजपचे विद्यमान उमेदवारही धुळ्यातील असल्याने काँग्रेसकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील उमेदवाराच्या बाजूने कौल देण्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे एमआयएमनेही उमेदवार देण्याचे  सुतोवाच केले आहे. धुळे मतदार संघात भाजप वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणे अपेक्षित असले तरी एमआयएमने उमेदवारी केल्यास भाजपच्या दृष्टीने ते फायद्याचे होईल अशी चर्चा आहे.

हेही वाचा:
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी गृहमंत्र्यांच्या सुनेने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; भाजपमध्ये करणार प्रवेश
नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा | Lok Sabha Election 2024
Nashik Congress | दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

Latest Marathi News प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेसची घुटमळ Brought to You By : Bharat Live News Media.