अकोला: बोर्डी येथे शेतमजुराचा भिंती कोसळून मृत्यू

अकोला, Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोट तालुक्यातील बोर्डी येथील शेतमजूर जगन्नाथ किसन सोनोने यांचा गुरुवारी (दि.२८) भिंतीखाली दबून मृत्यू झाला. बोर्डी येथील जगन्नाथ सोनोने यांना घरकुल मंजूर होऊन पहिला टप्पा मिळाल्याने त्यांचे जुने घर पाडणे सुरू होते.
गुरूवारी सकाळी ११ वाजता घराची भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची तपासणी करुन गंभीर जखमी असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा १ च्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
हेही वाचा
अकोला : आरटीओ कार्यालय सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार
Akola West assembly : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द: उच्च न्यायालयाचा निर्णय
अकोला : तापमानाने गाठला 40 डिग्री सेल्सिअस चा आकडा
Latest Marathi News अकोला: बोर्डी येथे शेतमजुराचा भिंती कोसळून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
