जळगाव- भाजपाने जळगाव लोकसभेच्या रिंगणात जळगाव, रावेर अशा दोनही ठिकाणी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. जळगाव मध्ये स्मिता वाघ तर रावेर मध्ये रक्षा खडसे भाजपकडून महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यासाठी भाजपाकडून लोकसभेची मोर्चे बांधणी होताना दिसून येत असली तरी महायुतीतील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोनही पक्षांनी सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसते. काही प्रमाणात अजित पवार गटाच्या बैठका सुरू आहे. मात्र शिंदे गटाच्या तर कोणत्याही हालचाली दिसून येत नाही आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपने या दोन मतदारसंघात एकला चलो रे ची भूमिका घेतलेली दिसत आहे. (Lok Sabha Election 2024)
भाजपाचे गेल्या 30 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये आगळे वेगळे कॉम्बिनेशन आहे. आजपर्यंत जळगाव लोकसभेतून भाजपचे खासदार विजय झालेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी आव्हान दिलेले असले तरी त्यांना लोकसभेवर आपला झेंडा फडकवता आलेला नाही. 2024 च्या निवडणुकीत महायुतीचे दोन्ही उमेदवार हे भाजपाचे आहेत. मात्र या युतीमधील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) हे दोन्हीही मुख्य पक्ष अजूनही निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेर आहे. भाजपाने आपल्या बैठकांचा जोर लावलेला असून कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सूचना केल्या आहेत. त्यासाठी भाजपाने नियोजनही केले आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)
आघाडीचेही वेट अँड वॉच Lok Sabha Election 2024
आघाडीचा विषय घेतला तर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीची तयारी खूपच पिछाडीवर आहे. आघाडी मधील राष्ट्रवादी(शरद पवार गट) , शिवसेना(उबाठा गट) व काँग्रेस यांचे कुठेही काही हालचाली दिसून येत नाहीये. कारण जो तो तिकिटासाठीच वाट पाहताना दिसून येत आहे. पक्षाचे नियंत्रण तर काय, पक्ष पदाधिकाऱ्यांचेही नियंत्रण कोणावरही दिसून येत नाहीये. सर्वजण उमेदवार जाहीर होण्याच्या भूमिकेत वेट अँड वॉच मध्ये थांबून राहिलेले आहेत. की जो उमेदवार जाहीर होईल त्याच्याकडे जायचे तोपर्यंत जो तो आपापल्या कामातच दिसून येत आहे.
पक्ष निहाय ताकदीचा विचार केला असता जळगाव लोकसभेमध्ये भाजपाचे दोनच आमदार आहेत. एक जळगाव शहराचे सुरेश भोळे आणि चाळीसगावचे मंगेश चव्हाण, तर युतीमधील शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण पालकमंत्री गुलाबराव पाटील, एरंडोल चिमणराव पाटील, पाचोरा किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकमेव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील, रावेर लोकसभेचा विचार केला असता यामध्ये भाजपाचे दोन आमदार येतात. त्यामध्ये राज्याचे संकट मोचक व जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार गिरीश महाजन, भुसावळ चे संजय सावकारे, युतीतील दुसरा घटक पक्ष शिवसेना शिंदे गट, चोपडा लता सोनवणे, मुक्ताईनगर अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय काँग्रेस रावेर शिरीष चौधरी, मलकापूर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार विजयी झालेले आहेत.
जळगाव लोकसभा
भाजप आमदार — जळगाव शहर, चाळीसगाव
शिवसेना शिंदे गट — जळगाव ग्रामीण ,एरंडोल ,पाचोरा
राष्ट्रवादी अजित पवार गट — अमळनेर
रावेर लोकसभा
भाजपा आमदार. जामनेर, भुसावळ,
शिवसेना शिंदे गट —- चोपडा, मुक्ताईनगर
काँग्रेस — रावेर,मलकापूर
जळगाव लोकसभा- मतदार संख्या
जळगाव सिटी 395164
जळगाव ग्रामीण 321635
अमळनेर 301233
एरंडोल 285811
चाळीसगाव 359682
पाचोरा 317948
एकूण-1981472 यात पुरुष -1031060 महिला- 950329 तृतीय पंथी- 83
रावेर लोकसभा
चोपडा 320738
रावेर 298332
भुसावळ 297634
जामनेर 321356
मुक्ताईनगर 294318
मलकापूर 279573
एकूण 3793423
पुरुष 1968114, महिला 1825172, तृतीयपंथी 137
हेही वाचा :
Chhatrapati Sambhajinagar News | संभाजीनगर हादरले! मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याने बापलेकाला जीपखाली चिरडले, एकाचा मृत्यू
चंद्रावर माणूस पाठवण्यासाठीचा खर्च…
Latest Marathi News जळगाव, रावेरमध्ये भाजपाचे ‘एकला चलो रे’, महायुतीतील पक्षांचे वेट अँड वॉच Brought to You By : Bharat Live News Media.