बॅगेतून आणलेला मृतदेह मुम्मेवाडी घाटात जाळण्याचा प्रयत्न

उत्तूर; पुढारी वृत्तसेवा: खोपोली येथे खून करण्यात आला. संबंधित मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी वाहतूक करून मुम्मेवाडी (ता. आजरा) येथील घाटात आणण्यात आला. दरम्यान हा मृतदेह एका अज्ञात महिलेकडून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान संशयित महिलेस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Kolhapur News) घटनाक्रम असा की, शुक्रवारी पहाटे १.३० च्या दरम्यान आजरा पोलिसांच्या पेट्रोलिंगवेळी मुम्मेवाडी घाटात … The post बॅगेतून आणलेला मृतदेह मुम्मेवाडी घाटात जाळण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

बॅगेतून आणलेला मृतदेह मुम्मेवाडी घाटात जाळण्याचा प्रयत्न

उत्तूर; Bharat Live News Media वृत्तसेवा: खोपोली येथे खून करण्यात आला. संबंधित मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी वाहतूक करून मुम्मेवाडी (ता. आजरा) येथील घाटात आणण्यात आला. दरम्यान हा मृतदेह एका अज्ञात महिलेकडून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान संशयित महिलेस पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Kolhapur News)
घटनाक्रम असा की, शुक्रवारी पहाटे १.३० च्या दरम्यान आजरा पोलिसांच्या पेट्रोलिंगवेळी मुम्मेवाडी घाटात संशयास्पद वाहन उभे असल्याचे आढळून आले.  पोलिसांनी अधिक चौकशी करता खून करून मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेने बॅगेतून आणलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांची गाडी आल्याचे समजतात महिलेसोबत आलेल्या चालकाने गाडीसह पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर खून दोन ते तीन दिवसांपूर्वी केला असल्याचे समजते. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना गंभीर असल्याने समजले जात. या खूनासंदर्भात अधिक तपास केला जात असल्याचे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.(Kolhapur News)
Latest Marathi News बॅगेतून आणलेला मृतदेह मुम्मेवाडी घाटात जाळण्याचा प्रयत्न Brought to You By : Bharat Live News Media.