बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्यांचा मृत्यू : तीन जखमी; १ पळवली
नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील प्रमोद येंधे या शेतकऱ्याच्या सहा शेळ्या बिबट्याने फस्त केल्या, तसेच दोन गंभीर जखमी केल्या आहेत व एक शेळी बिबट्या गोठ्यातून घेऊन पोबारा केला. ही घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याने लोखंडी तारेची जाळी तोडून आत प्रवेश करून शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबतची माहिती अशी की, हिवरे खुर्द येथील प्रमोद येंधे शेळी पालनाचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करीत आहेत. बिबट्याचा शेळ्यावर हल्ला होऊ नये, म्हणून येंधे यांनी शेळयांच्या गोठ्याला लोखंडी तारेची जाळी लावली होती. परंतु शुक्रवारी बिबट्याने लोखंडी जाळी वरच्या बाजूने वाकवून गोठ्यात प्रवेश केला व सहा शेळ्या ठार केल्या, तीन गंभीर जखमी केल्या व एक घेऊन गेला. दरम्यान एक बिबट्या दहा शेळ्या एकाच वेळी ठार करण्याची शक्यता कमी असून दोन बिबटे गोठ्यात आले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वन खात्याच्या धोरणानुसार मृत व जखमी शेळ्यांची भरपाई देण्यात येणार आहे. दरम्यान परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच असून दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे. वन खात्याने तात्काळ पिंजरा बसवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा
‘या’ पक्ष्याच्या विष्ठेपासून बनते महागडी कॉफी!
‘बालगंधर्व’चा पडदा पुन्हा खुला! नव्या रूपात रंगला नाट्यप्रयोग
सिंधू संस्कृतीचा र्हास 4 हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने?
Latest Marathi News बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्यांचा मृत्यू : तीन जखमी; १ पळवली Brought to You By : Bharat Live News Media.