पाण्याअभावी सुकला नारळ; नगामागे भाव सहा ते आठ रुपयांनी वधारले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शाकाहारापासून सामिष पदार्थांची चव वाढवण्यासाठी भाजीत ओलं खोबरं आवर्जून घातलं जातं. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. मात्र, यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला आहे. बाजारात दर्जेदार नारळ कमी प्रमाणात येत आहेत. त्यास हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह घरगुती ग्राहकांकडून मागणी असल्याने दर्जेदार नारळ चांगलाच भाव … The post पाण्याअभावी सुकला नारळ; नगामागे भाव सहा ते आठ रुपयांनी वधारले appeared first on पुढारी.

पाण्याअभावी सुकला नारळ; नगामागे भाव सहा ते आठ रुपयांनी वधारले

शंकर कवडे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शाकाहारापासून सामिष पदार्थांची चव वाढवण्यासाठी भाजीत ओलं खोबरं आवर्जून घातलं जातं. त्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. मात्र, यंदा निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा त्यात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम मोठ्या प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर झाला आहे. बाजारात दर्जेदार नारळ कमी प्रमाणात येत आहेत. त्यास हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह घरगुती ग्राहकांकडून मागणी असल्याने दर्जेदार नारळ चांगलाच भाव खाऊ लागले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत नारळ नगामागे 6 ते 8 रुपयांनी महागले असून, किरकोळ  बाजारात नारळाची 50 ते 60 रुपयांना विक्री होत आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून आवक होत आहे.

मद्रास, साफसोल, नवा नारळ आणि पालकोल नारळाची बाजारात दररोज 1500 ते 2000 गोण्यांची आवक होत आहे. यामध्ये, एक हजार नारळामागे सरासरी अवघे 200 नारळ मोठ्या आकाराचे आहेत. शाकाहारापासून मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी हॉटेल, खानावळ, केटरिंगवाल्यांकडून मोठ्या आकाराच्या मद्रास आणि साफसोल नारळाला मोठी मागणी राहते. मागणीच्या तुलनेत सध्या या नारळांची आवक कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत मद्रास नारळाच्या भावात शेकड्यामागे 550 ते 600 रुपयांनी, तर साफसोलच्या भावात 600 ते 800 रुपयांनी वाढ झाली आहे. नवा नारळ व पालकोलचा वापर खाद्यपदार्थांसाठी कमी होत असल्याने या नारळाचे भाव गतवर्षीच्या तुलनेत टिकून आहेत.
घरोघरी नारळाचा होतो वापर
बाजारात जवळपास चार प्रकारचे नारळ उपलब्ध आहेत. तामिळनाडूचा नवा नारळ हा धार्मिक विधीसाठी वापरण्यात येतो. हा नारळ आकाराने छोटा व मध्यम असतो. तर, आंध्रचा पालकोल तसेच मद्रास नारळास किराणा दुकानदारांकडून मोठी मागणी राहते. हा नारळ घराघरांत स्वयंपाकासाठी वापरला जातो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड, खोबरे चवीला उत्तम असल्याने हॉटेल व्यावसायिक, खानावळ, केटरिंग व्यावसायाकडून या नारळाला मोठी मागणी राहते.

दर्जेदार नारळ उपलब्धता कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. सध्या मद्रास व साफसोल या नारळांमध्येच वाढ झाली आहे. पुढील आठवड्यापासून चैत्र महिना सुरू होत असून, यात्रा, जत्रांचा काळ सुरू झाल्यानंतर अन्य नारळांनाही मागणी वाढेल. परिणामी, त्यांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

– दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केट यार्ड.

हेही वाचा

‘या’ पक्ष्याच्या विष्ठेपासून बनते महागडी कॉफी!
पुणेकरांनो काळजी घ्या ! शहराने गाठली तापमानाची ‘चाळीशी’!
5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत

Latest Marathi News पाण्याअभावी सुकला नारळ; नगामागे भाव सहा ते आठ रुपयांनी वधारले Brought to You By : Bharat Live News Media.