पुण्यात कोयत्याची दहशत थांबेना ! कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात कोयतेधारी टोळक्याने गैरसमजुतीतून केबल टाकणार्‍या तरुणावर हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. या टोळक्याने आरडाओरडा करत शिवीगाळदेखील केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात प्रकाश राठोड (वय 21, रा. भोसरी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला … The post पुण्यात कोयत्याची दहशत थांबेना ! कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा.. appeared first on पुढारी.

पुण्यात कोयत्याची दहशत थांबेना ! कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात कोयतेधारी टोळक्याने गैरसमजुतीतून केबल टाकणार्‍या तरुणावर हल्ला केल्याची घटना मध्यरात्री घडली. या टोळक्याने आरडाओरडा करत शिवीगाळदेखील केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात प्रकाश राठोड (वय 21, रा. भोसरी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 28 मार्च रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ड्रॅगन चायनिजसमोर, अमेय अपार्टमेंट डी. पी. रोड औंध येथे घडली.
फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र इंटरनेटचा पुरवठा करणार्‍या कंपनीत नोकरी करतात. ते कंपनीकडून केबल टाकण्याचीही कामे करतात. दरम्यान, ते औंधमधील डी. पी. रोडवर पहाटे साडेतीनच्या सुमारास केबल टाकण्याचे काम करत होते. यादरम्यान, अचानक चौघे जण हातात कोयते घेऊन त्याठिकाणी मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत आले. फिर्यादींचा एक सहकारी केबल घेण्यासाठी जात असताना टोळक्याने विनाकारणच त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात व हातावर वार केले. त्यानंतर टोळके पसार झाले.
या घटनेत तरुण जखमी झाला आहे. पोलिसांनी शोध घेऊन चौघांना पकडले असून, चौकशीत दोघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.
तक्रार आली नाही… शहरात कोयताधार्‍यांनी धुमाकूळ घातला असताना येरवडा परिसरातील कोयतेधारी तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ते एका तरुणाचा पाठलाग करताना दिसत आहेत. परंतु, या घटनेबाबत कोणी तक्रार करायला न आल्याने अद्याप याबाबत गुन्हा किंवा कारवाई केली नसल्याचे येरवडा पोलिस सांगत आहेत.
दहावीचा पेपर देऊन निघालेल्या विद्यार्थ्यावर हत्याराने वार
दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या तरुणाला शिवीगाळ करून हत्याराने मारहाण करून जखमी केल्याची घटना कात्रज परिसरात घडली. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी दीडच्या सुमारास कात्रज- कोंढवा रोडवरील कृष्णा सागर हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी कात्रजमधील संतोषनगर येथील 17 वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षीय मुलगा दहावीचा पेपर सुटल्यानंतर घरी जात होता. त्या वेळी आरोपीने त्याला हाक मारून थांबवले. आरोपींनी त्याला तुला खूप माज आलाय का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
कात्रजमध्ये जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला मारहाण
कात्रज भागात जुन्या वादातून 17 वर्षीय मुलाला मारहाण करून हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मुलगा व त्याचा मित्र गप्पा मारत बसले होते. तेव्हा त्याच्या मित्राचे पूर्वी झालेल्या वादातील आरोपी साथीदारासोबत आला. जुन्या वादातून शिवीगाळ केली. त्यावेळी तो पळून गेला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पुढील तपास उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.
हेही वाचा

5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत
BSNL | बीएसएनएल सेवेचे अस्तित्व धोक्यात; ग्राहकांनी फिरविली पाठ
ई-बस डेपोला नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचा विरोध

Latest Marathi News पुण्यात कोयत्याची दहशत थांबेना ! कोयतेधारी टोळक्याचा पुन्हा राडा.. Brought to You By : Bharat Live News Media.