5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत

लंडन : गोंदण्याची कला ही जूनीच आहे. सध्या हीच कला ‘टॅटू’ असे नाव घेऊन पुन्हा आलेली आहे. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात ते यासाठीच! गोंदण्याची कला पाच हजार वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात आहे हे विशेष. 1991 मध्ये इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतराजीत 5300 वर्षांपूर्वीच्या एका माणसाची बर्फाखाली नैसर्गिकरीत्या तयार झालेली ममी सापडली होती. हजारो वर्षे बर्फाखाली राहिल्याने … The post 5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत appeared first on पुढारी.

5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत

लंडन : गोंदण्याची कला ही जूनीच आहे. सध्या हीच कला ‘टॅटू’ असे नाव घेऊन पुन्हा आलेली आहे. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात ते यासाठीच! गोंदण्याची कला पाच हजार वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात आहे हे विशेष. 1991 मध्ये इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्स पर्वतराजीत 5300 वर्षांपूर्वीच्या एका माणसाची बर्फाखाली नैसर्गिकरीत्या तयार झालेली ममी सापडली होती. हजारो वर्षे बर्फाखाली राहिल्याने त्याचे शरीर सुरक्षित राहिले होते. या माणसाला संशोधकांनी ओत्झी असे नाव दिले. त्याच्या शरीरावरही गोंदण आहे. विशेष म्हणजे त्या काळात सध्यासारखीच गोंदण्याची विशिष्ट पद्धत होती, असे आता दिसून आले आहे.
ओत्झीचा देह काही गिर्यारोहकांना अपघातानेच सापडला होता. त्यावेळेपासूनच त्याच्या देहाबाबत तसेच अवजारे, शस्त्रांबाबत वेगवेगळे संशोधन होत आहे. त्याचे कपडे आणि त्याच्या शेवटच्या जेवणावरही संशोधन झालेले आहे. आता त्याच्या शरीरावरील 61 टॅटूंवर संशोधन करण्यात आले.
टेनेसीच्या डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायर्न्मेंट अँड काँझर्व्हेशनच्या एरन डेटर-वुल्फ यांनी याबाबतचे संशोधन केले. त्यांनी सांगितले की, ओत्झीच्या शरीरावर हातानेच गोंदण बनवलेले आहे. याचा अर्थ सध्याप्रमाणेच सुईच्या सहाय्याने त्वचेत टोचून गोंदवण्यात आले आहे. सध्याच्या आधुनिक टॅटू मशिन्सशीही त्याचे साधर्म्य आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती युरोपियन जर्नल ऑफ आर्कियोलॉजीमध्ये देण्यात आली आहे.
Latest Marathi News 5300 वर्षांपूर्वी सध्यासारखीच गोंदवण्याची पद्धत Brought to You By : Bharat Live News Media.