मनमोहन सिंग यांची भाजपनं माफी मागावी : संजय राऊत
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली यूपीए सरकारमध्ये भाजपने एअर इंडिया भष्ट्राचार प्रकरणी गदरोळ घातला होता. दरम्यान याच प्रकरणात आता भाजपने प्रफुल्ल पटेल यांनी भाजप सरकारने क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांना क्लीनचिट दिल्यानं भाजपनं मनमोहन सिंगांची माफी मागावी, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज (दि.२९) माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Election)
पुढे खासदार राऊत यांनी भष्ट्राचाराबाबत भाजपचं धोरण दुटप्पी आहे, असा आरोप देखील नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर केला आहे. संविधान वाचवण्याची जबाबदारी देशातील प्रत्येकाची आहे. आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंबीर खुपसण्याविरोधी आहे. जे संविधानाच्या पाठीत खंबीर खुपसणारे आहेत. त्याच्यासोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर उभे राहणार नाहीत, असा ठाम विश्वास देखील त्यांनी दाखवला आहे. (Lok Sabha Election)
प्रकाश आंबेडकर कालपर्यंत नाना पटोलेंवर देखील टीका करत होते. वंचितने महाविकास आघाडीसोबत यावं ही आमची आमची इच्छा आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी जी एक्स पोस्ट केली आहे. त्यांच्याशी माझा संबंध नाही. मी सध्या मविआ संदर्भात काही बोलणार असे म्हणत ३ एप्रिल रोजी होणाऱ्या मविआच्या पत्रकार परिषदेत सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही खासदार राऊत म्हणाले. (Lok Sabha Election)
मविआचं जागावाटप पूर्ण कोणताही वाद नाही. कल्याण, पालघरच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करणार आहे. दरम्यान पालघरची जागा आम्हीच जिंकणार. तसेच ठाणे, कल्याणची जागा देखील ठाकरेंची शिवसेनाच जिंकणार असा विश्वास देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
Congress | लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका! I-T ने बजावली १,७०० कोटींची नोटीस
Loksabha election | मावळात कोणती सेना मावळणार? शिवसेनचे दोेन्ही गट आमनेसामने
Lok Sabha Election 2024 : गडकरी यांची हॅट्टिकची तयारी; पाच लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास
Latest Marathi News मनमोहन सिंग यांची भाजपनं माफी मागावी : संजय राऊत Brought to You By : Bharat Live News Media.