आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या कामाचे आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. राग टाळा, … The post आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या कामाचे आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. राग टाळा, अन्‍यथा परिस्थिती बिघडू शकते. आपल्या मौल्यवान वस्तूंची स्वतः काळजी घ्या. चुकीच्या प्रवासातही वेळ जाऊ शकतो. व्यवसायात प्रत्येक छोट्या गोष्टीला गांभीर्याने घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पती-पत्नीमधील सौहार्दाचे मूल्य चांगले राखले जाईल. ऍलर्जीमुळे खोकला, ताप किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आजची वेळ आत्मनिरीक्षणाची आहे. अचानक एखादे अशक्य काम शक्य होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. समाजात मान-सन्मानही राखला जाईल. अनावश्यक कामात खर्च जास्त होईल. तुमच्या बजेटची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतो. या सर्व गोष्टींपासून दूर राहा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही.
मिथुन : आज अनुभवी व्यक्तीची भेट तुमच्या विचारात सकारात्मक बदल घडवेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. भावनेच्‍या आहारी जावून घेतलेल्‍या निर्णयाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. चुकीच्या कामात वेळ वाया घालवू नका. कार्यक्षेत्रात थोडे अडथळे येऊ शकतात; संयमाने परिस्‍थिती हाताळा.. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
कर्क : आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा सल्‍ल्‍यामुळे अनेक समस्या दूर होऊ शकतात, असे श्रीगणेश सांगतात. नात्यातील शुभ माहिती मिळाल्याने मन प्रसन्न राहील. स्थान बदला संबंधित योजना असेल. तुमच्या कामांना प्राधान्य द्या. कौटुंबिक बाबींमध्ये बाहेरच्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. वैवाहिक जीवन मधुर राहील.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, मागील काही काळापासून झालेली कोंडी आणि अस्वस्थता यापासून आज आराम मिळू शकेल. त्‍यामुळे स्वतःला उर्जेने भरलेले अनुभवाल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत काही महत्त्वपूर्ण निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील. घर, वहानांच्‍या कागदपत्रांची काळजी घ्‍या. कल्पनेपेक्षा वास्‍तावाचा विचार करा. मुलाच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. आज व्यवसायात काही नवीन करार मिळू शकतात. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.
कन्या : आज तुम्‍ही तुमच्‍या कृतीने लोकांना प्रभावित कराल. आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी हा काळ उत्तम आहे. ध्येय गाठण्यासाठी केलेल्या मेहनतीला यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. घरात पाहुण्यांच्या हालचालींमुळे अनेक महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करणे तुमच्यासाठी बदनामीचे कारण ठरू शकते. कौटुंबिक समस्येवर पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने काळ फारसा अनुकूल नाही.
तूळ: श्रीगणेश म्हणतात की, आज धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. परिस्थिती अनुकूल आहे. आज घेतलेला महत्त्वाचा निर्णय नजीकच्या भविष्यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरेल. आर्थिक बाबतीत अधिक समजूतदारपणाने आणि चर्चा करूनच निर्णय घ्या. निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण होवू शकते. इतरांच्‍या कामात ढवळाढवळ करू नका. कार्यक्षेत्रात आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. पती-पत्नी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील.
वृश्चिक: आज काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रलंबित काम पूर्ण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीमुळे परीक्षेचा योग्य निकाल मिळेल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. कोणत्याही गुंतवणुकीतबाबत निर्णय घेणे टाळा, असे सल्‍ला श्रीगणेश देतात.
धनु : आज जमीन किंवा वाहन खरेदीची योजना असू शकते. व्यावसायिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. जवळच्या नातेवाईकाशी जुने मतभेद संपुष्‍टात येतील, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होवू नका. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजनांचा विचार करण्‍याची गरज आहे.
मकर : आजचे ग्रहमान पूर्णपणे अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती मजबूत असेल. आळस सोडा आणि तुमच्या ध्येयाची पूर्ण जाणीव ठेवा. घरातील कोणतेही वादग्रस्त प्रकरणही सोडवले जाऊ शकते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित कर्ज घेण्यापूर्वी सल्ला घ्या. व्यवसायातील क्षेत्रासाठी कोणत्याही नवीन योजनांचा विचार करा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
कुंभ: श्रीगणेश म्हणतात की, कुटुंबात सुख आणि शांती ही तुमच्यासाठी पहिली प्राथमिकता असेल. काम आणि कुटुंबातही चांगला सुसंवाद राहील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नासोबतच खर्चाचीही स्थिती राहील. मशिन, कर्मचारी आदींशी संबंधित किरकोळ समस्या समोर येतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल.
मीन: आज प्रत्येक समस्या सोडवू शकाल. शहाणपणाने घेतलेला कोणताही निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल. केवळ विचारांपेक्षा कृतीला महत्त्‍व द्‍या. बऱ्याच वेळा जास्त चर्चा केल्याने अनेक महत्त्वाच्या संधी हुकतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा होईल, असे श्रीगणेश सांगतात.
Latest Marathi News आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.