‘मिल्की वे’ मधील कृष्णविवरातून उष्ण फवारे
वॉशिंग्टन : प्रत्येक आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक कृष्णविवर असते. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानीही एक शक्तिशाली कृष्णविवर आहे. त्याचे नाव आहे ‘सॅजिटेरियस ए’. या आकाशगंगेतून अतिशय तप्त सामग्रीचे फवारे बाहेर पडतात असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अर्थात हे फवारे छुपेच आहेत. मात्र, तरीही इव्हेंट होरीझोन टेलिस्कोपच्या सहाय्याने या फवार्यांच्या काही प्रतिमा टिपण्यात यश आले आहे.
ही एक पृथ्वीभोवती फिरणारी रेडिओ ऑब्झर्व्हेटरी असून तिनेच 2022 मध्ये ‘सॅजिटेरियस ए’ चा पहिलावहिला फोटो टिपला होता. हे कृष्णविवर आपल्या सूर्यापासून 27 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहे. आता पोलराईज्ड लाईटच्या सहाय्याने त्याच्या या फवार्यांची नवी छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकाश असतो ज्याला मानवी डोळे अन्य प्रकाशापेक्षा वेगळे पाहू शकत नाहीत. मात्र, त्याला रेडिओ टेलिस्कोप अचूक हेरत असतात.
एखाद्या कृष्णविवराची आकर्षण शक्ती प्रचंड असते. त्याच्या तावडीतून प्रकाशाचा किरणही सुटू शकत नाही. मात्र, त्यामधून असे पोलराईज्ड प्रकाश किरण उत्सर्जित होत असतात. त्यांना या नव्या छायाचित्रांमध्ये टिपलेले आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘द अस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ मध्ये देण्यात आली आहे.
Latest Marathi News ‘मिल्की वे’ मधील कृष्णविवरातून उष्ण फवारे Brought to You By : Bharat Live News Media.