बेळगाव : सहकारी मजुरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

खानापूर : पुढारी वृत्तसेवा दारूच्या नशेत वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या रागातून दोघा सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत रस्ते कामगाराचा मृत्यू झाला. जेटाप्पा उर्फ रवी शरणाप्पा हिरेकुरबर (वय 35) रा. अस्थी ता. तालिकोटे जि. विजापूर असे त्याचे नाव आहे. गुंजी ता. खानापूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी विजयकुमार निंगान्ना थेवर रा. वडगेरा-शहापूर हळियाळ जि. यादगिर आणि यल्लाप्पा … The post बेळगाव : सहकारी मजुरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

बेळगाव : सहकारी मजुरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

खानापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा दारूच्या नशेत वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या रागातून दोघा सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत रस्ते कामगाराचा मृत्यू झाला. जेटाप्पा उर्फ रवी शरणाप्पा हिरेकुरबर (वय 35) रा. अस्थी ता. तालिकोटे जि. विजापूर असे त्याचे नाव आहे. गुंजी ता. खानापूर येथे ही घटना घडली. या प्रकरणी विजयकुमार निंगान्ना थेवर रा. वडगेरा-शहापूर हळियाळ जि. यादगिर आणि यल्लाप्पा शेट्टाप्पा तालिकोटी रा. केंभावी जि. यादगिर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, बेळगाव पणजी महामार्गाचे काम करणाऱ्या मजुरांसाठी यशस्वी रोड वर्क्स या कंपनीने गुंजी येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी 26 मार्च रोजी रात्री 9 वाजता जेटाप्पा दारूच्या नशेत आला. त्याने विजयकुमार याला शिवीगाळ केली. या रागातून विजयकुमार व त्याचा मित्र यल्लापा या दोघांनी डोके व तोंडावर जबर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
बेळगाव सिव्हिल इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना आज सकाळी 9 वाजता त्‍याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यशस्वी रोड वर्क्स या कंपनीवर देखील निष्काळीजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा : 

ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न

लोकसभा लढविण्यावरून मराठा समाजात मतभेद; आज पुन्हा बैठक

निवडणूक येता घरा… महागाई येतसे प्रचारा!

Latest Marathi News बेळगाव : सहकारी मजुरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.