Loksabha election | मावळात कोणती सेना मावळणार? शिवसेनचे दोेन्ही गट आमनेसामने
किरण जोशी
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघाच्या बालेकिल्यासाठी शिवसेनेच्या दोेन्ही गटांमध्येच फाईट होणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मित्रपक्षाची प्रामाणिक साथ मिळविण्याबरोबरच शिवसेनेच्या पारंपरिक मतदाराला आकर्षित करण्याचे आव्हान दोन्ही गट आणि उमेदवारांसमोर असणार आहे. मावळात गेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यामुळे तिसर्या टर्ममध्येही महायुतीकडून सेनेचाच उमेदवार दिला जाईल, हे स्पष्ट होते.
शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळेल आणि दोन्ही सेनेमध्येच निवडणूक होईल, या आशयाचे वृत्त Bharat Live News Mediaने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केले होते. त्यानुसार गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा झाली. अनपेक्षितपणे ठाकरे गटात प्रवेश केलेले संजोग वाघेरे हे त्यांच्या विरोधात लढत आहेत. लोकसभेचा नवखा उमेदवार विरुद्ध अनुभवी अशी लढत होत असली तरी शिवसेनेचा पारंपरिक मतदार आणि मित्रपक्षाकडून मिळणार्या ताकदीवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
मतदार अन् चिन्ह ठरणार
मावळात गेल्या तीनही निवडणुकांमध्ये एक ते दोन लाखांच्या मताधिक्याने शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार वर्ग येथे आहे. मात्र, सेनेच्या फुटीनंतर ठाकरे गट मशाल चिन्हावर निवडणूक लढवित असल्याने नवीन चिन्ह पोहोचविण्याचे आव्हान संजोग वाघेरे यांच्यासमोर आहे. याउलट श्रीरंग बारणे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. मात्र, शिंदे गटावर असणारा गद्दारीचा शिक्का पुसून पारंपरिक मतदारांना टिकविण्यासाठी बारणे यांचा कस लागणार आहे.
हेही वाचा
ड्रग्ज तस्करीत आंतरराष्ट्रीय कनेक्शन ! दोन आंतरराष्ट्रीय माफियांची नावे निष्पन्न
धक्कादायक ! भांडगावला कंपनीत वायू गळती; एक मृत्युमुखी, दोन जखमी
लोकसभा लढविण्यावरून मराठा समाजात मतभेद; आज पुन्हा बैठक
Latest Marathi News Loksabha election | मावळात कोणती सेना मावळणार? शिवसेनचे दोेन्ही गट आमनेसामने Brought to You By : Bharat Live News Media.