शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी  पाटील यांचे आज (दि.२९) निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या.  त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती. (Meenakshi Patil passed away) Meenakshi Patil passed away : कामगार पक्षाच्या … The post शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन appeared first on पुढारी.

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबाग, Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी  पाटील यांचे आज (दि.२९) निधन झाले. त्या दीर्घकाळ आजारी होत्या.  त्यांच्यावर आज पेझारी येथे दुपारी २ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या अशी त्यांची ओळख होती. (Meenakshi Patil passed away)
Meenakshi Patil passed away : कामगार पक्षाच्या झुंजार नेत्या
माहितीनुसार, शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला.  त्या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या १९९५, १९९९ आणि २००९ अशा 3 वेळा त्या आमदार होत्या. १९९९ मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या काही काळ विकास राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. रायगड जिल्ह्यात प्रकल्प विरोधी अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता.  शेकापचे आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जात आहे. एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती.

Latest Marathi News शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन Brought to You By : Bharat Live News Media.