यवतमाळ : चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट; मेकॅनिक ठार

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट होऊन गुरूवारी (दि.२८) मेकॅनिकचा जागीच मृत्यू झाला. तस्किल शेख वकील (३५, रा. शास्त्रीनगर आर्णी) असे या मेकॅनिकचे नाव आहे. बॅटरीचा स्फोट इतका भीषण होता की, तस्किल काही फूट अंतरापर्यंत फेकला गेला. आर्णी शहरातील माहूर चौकात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
तस्किल हा अनेक वर्षापासून इन्वर्टर बॅटरी दुरुस्ती व सीसीटीव्ही बसविण्याचे काम करत होता. त्याच्याकडे दुरुस्तीला आलेल्या बॅटरी तो रात्री चार्जिंगला लावत असे, रमजानचा महिना असल्याने तस्कील याने रोजा ठेवला होता. गुरुवारी पहाटे तीन वाजता तो रोजा सोडण्याठी उठला व व नंतर माहूर चौकातील दुकानाकडे निघाला. त्याने दिवसाच्या लावलेल्या बॅटरी चार्जिंगवरून काढण्यासाठी दुकान उघडले.
मात्र दुकान उघडताच अघटीत घडले. अचानक बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात तस्किल हा दहा फुट अंतरापर्यंत हवेत फेकला गेला. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेने आर्णी शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
जळगाव : शिरसोली गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक
रत्नागिरी : खंडणी न दिल्याने सरपंचाचा एकावर चाकूहल्ला
यवतमाळ : राळेगाव शहरात जुन्या वादातून युवकाचा खून
Latest Marathi News यवतमाळ : चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट; मेकॅनिक ठार Brought to You By : Bharat Live News Media.
