लोकसभेसाठी समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर; अखिलेश यादव, जया बच्चन, डिंपल यादवांसह ४० प्रमुख नेत्यांचा समावेश

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : समाजवादी पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, खासदार जया बच्चन, डिंपल यादव यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवार निश्चितीसह सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या तयार केल्या आहेत. काल भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि समाजवादी पक्षाच्या वतीनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण ४० स्टार प्रचारक असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामगोपाल यादव ही यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.
समाजवादी पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, उपाध्यक्ष किरणमय नंदा, पक्षाचे मुख्य सरचिटणीस राम गोपाल यादव, खासदार जया बच्चन, खासदार डिंपल यादव, सरचिटणीस मो. आझम खान, खासदार जावेद अली खान, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश पटेल, पक्षाचे नेते शिवपाल यादव, रामजी लाल सुमन, राम गोविंद चौधरी, इंद्रजीत सरोज आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
Latest Marathi News लोकसभेसाठी समाजवादी पक्षाचे स्टार प्रचारक जाहीर; अखिलेश यादव, जया बच्चन, डिंपल यादवांसह ४० प्रमुख नेत्यांचा समावेश Brought to You By : Bharat Live News Media.
