भंडारा : लेंडेझरीत दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे जिल्ह्यातील जंगलात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे वाघांच्या अकाली मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. बुधवारी दोन वाघांच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाला. लेंडेझरी-२ बीट येथे ही घटना उघडकीस आली. मृत वाघाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा आहेत. यावरून झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. परिसरातील वर्चस्वाच्या लढाईत या वाघाचा … The post भंडारा : लेंडेझरीत दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

भंडारा : लेंडेझरीत दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

भंडारा; Bharat Live News Media वृत्तसेवा : एकीकडे जिल्ह्यातील जंगलात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे वाघांच्या अकाली मृत्यूच्या घटनाही घडत आहेत. बुधवारी दोन वाघांच्या झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाला.
लेंडेझरी-२ बीट येथे ही घटना उघडकीस आली. मृत वाघाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा आहेत. यावरून झुंजीत मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. परिसरातील वर्चस्वाच्या लढाईत या वाघाचा मृत्यू झाला असावा. भंडारा वनविभागांतर्गत लेंडेझरी २ बीट येथील कंपार्टमेंट क्रमांक ४९ मध्ये वाघाचा मृत्यू झाल्याची  माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना मिळाल्याने वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.  त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी ओरखडे आणि धारदार नखांच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. दोन वाघांच्या वर्चस्वासाठीच्या लढाईत एकाने प्राण गमावले, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी बांधला आहे. हा वाघ अंदाजे ४ ते ५ वर्षांचा आहे. आता जंगलातही वाघ सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी एका वाघिणीला विष देऊन ठार करण्यात आले होते. याप्रकरणी संबंधित शेतकºयालाही अटक करण्यात आली होती.
Latest Marathi News भंडारा : लेंडेझरीत दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.