CBI चा प्रफुल्ल पटेलांना दिलासा! २०१७ मधील भ्रष्टाचारातील आरोपांची फाईल बंद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील 2017 मधील भ्रष्टाचाराचा खटला बंद केल्याची माहिती समोर आली आहे. द वायर या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
सीबीआयने मे 2017 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. जवळपास सात वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर सीबीआयने प्रफुल्ल पटेल आणि एमओसीए आणि एअर इंडियाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन तपास बंद केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
The post CBI चा प्रफुल्ल पटेलांना दिलासा! २०१७ मधील भ्रष्टाचारातील आरोपांची फाईल बंद appeared first on Bharat Live News Media.
