‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात

पुढारी ऑनलाईन डेस्क : नृत्यागना म्हणून ओळख असलेल्या मेघा घाडगे ( Megha Ghatge ) हिने अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक … The post ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात appeared first on पुढारी.
‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नृत्यागना म्हणून ओळख असलेल्या मेघा घाडगे ( Megha Ghatge ) हिने अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधता येत आहे.
संबंधित बातम्या 

Kiara Advani-Ram Charan : ‘गेम चेंजर’ रिलीज डेट! राम चरण-कियारा आडवाणी घालणार धुमाकूळ
लेक असावी तर अशी : ‘माहेरची साडी’ च्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट
मोठी बातमी! अभिनेता गोविंदाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चंद्रकांत पवार यांनी दिग्दर्शक म्हणून यापूर्वी ‘विठ्ठला शप्पथ’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला आहे. आता ‘अप्सरा’ या चित्रपटातून आणखी एक नवी गोष्ट घेऊन ते आपल्या भेटीस येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप जाहीर केली नसली तरी लवकरच समोर येतील.

मेघा घाडगे ( Megha Ghatge ) यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनेत्रीचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आहे. मात्र ‘अप्सरा’ हा चित्रपट त्यांच्यासाठी वेगळा ठरणार आहे. कारण या चित्रपटात त्या साकारत असलेली भूमिका ही अनोखी आहे. तर बोलक्या डोळ्यातून अभिनयाची मोहोर उमटवणारे अभिनेते विट्ठल काळे हे देखील चित्रपटाची जमेची बाजू असणार आहेत.

तसेच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे, आपल्या रसभरीत गीतातून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गीतकार मंगेश कांगणे यांनीच आपल्या शब्दांना स्वरबद्ध केले आहे.
Latest Marathi News ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार ‘अप्सरा’ चित्रपटात Brought to You By : Bharat Live News Media.