
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले आहेत. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी ‘लेक असावी तर अशी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या
मोठी बातमी! अभिनेता गोविंदाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Aditi Rao Hydari-Siddharth : लग्न नव्हे…अदिती राव हैदरी-सिद्धार्थच्या साखरपुड्याचा फोटो समोर
The Sabarmati Report Teaser : हृदयद्रावक कथा घेऊन आला विक्रांत मेसी, ‘द साबरमती रिपोर्ट’ टीजर
विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येत आहे. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहित असलेले विजय कोंडके हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या रंजनासाठी घेऊन सज्ज झाले आहेत.
Latest Marathi News ‘माहेरची साडी’ च्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट Brought to You By : Bharat Live News Media.
