रायगड : पनवेलमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

पनवेल; विक्रम बाबर : पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन पनवेल मधील हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तोतया पोलीस अधिकऱ्यांकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सलमान तजमुद्दीन मुलाणी (वय ३१ वर्षे, धंदा चिकन शॉप, रा. पुणे) असे पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव … The post रायगड : पनवेलमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याचा पर्दाफाश appeared first on पुढारी.

रायगड : पनवेलमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

पनवेल; विक्रम बाबर : पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करुन पनवेल मधील हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तोतया पोलीस अधिकऱ्यांकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
सलमान तजमुद्दीन मुलाणी (वय ३१ वर्षे, धंदा चिकन शॉप, रा. पुणे) असे पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. अंगावर खाकी वर्दी, पायात पोलीस सूज ,डोक्याला खाकी गोल टोपी आणि खांद्यावर स्टार असा पोलिसी गणवेश करून सलमान पनवेल सह अन्य परिसरात अनेक दिवसा पासून वावरत होता, मात्र त्याच्या एका चुकीमुळे सलमान पनवेल पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सलमानने पोलीस उप निरीक्षकचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून पनवेल कोळखे येथील सिताज हॉटेल (गोल्ड डिग्गर), मधील  मॅनेजरला शिवीगाळ करत तू माझ्या मैत्रीणीला कामावरुन का काढून टाकले, चल तिचा हिशोब दे अन्यथा  तुझे हॉटेल बंद करुन टाकीन अशी धमकी देत त्याला मारहाण केली, त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करुन पुण्यावरुनया आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस परिधान केलेल्या घालून पोलीस अधिकाऱ्याने मला विनाकारण धमकावून मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जावून स्वतःला पोलीस उप निरीक्षक म्हणुन सांगणारे सलमान तजमुददीन मुलाणी याचेकडे कौशल्यपुर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. हॉटेल मॅनेजर यांची तकार घेवून आरोपी विरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम १७०, ३२३, ५०४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
खांद्यावर किती स्टार आहे या प्रश्नांमुळे सलमान आला अडचणीत
पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पोचून खाकी वर्दी परिधान केलेल्या सलमान ला जाब विचारण्यास सुरवात केल्या नंतर , सलमान पोलिसाच्या प्रश्नाला घाबरू लागला होता त्याच्या बोलण्याच्या पद्धती वरून त्याचा संशय पोलिसांना आला, गमतीची गोष्ट म्हणजे या इसमाने  खाकी वर्दी घातली होती, पण त्याच्या खांद्यावर किती तारे आहेत हे त्याला माहीत नव्हते.
तो दाढी वाला कर्मचारी कोण
तोतया पोलीस अधिकाऱ्याला अटक केल्या नंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात या पोलीस अधिकाऱ्याला आणले, त्या वेळी त्याच्या सोबत एक टी शर्ट परिधान केलेला दाढी असलेला एक खाजगी कर्मचारी दिसून येत होता, त्या मुळे हा कर्मचारी कोण असा अनेकांना प्रश्न पडला आहे. हा दाढी वाल्या कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यात सतत दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
Latest Marathi News रायगड : पनवेलमध्ये तोतया पोलीस अधिकाऱ्याचा पर्दाफाश Brought to You By : Bharat Live News Media.