Crime News : हॉटेलमध्ये डल्ला मारणार्‍या नोकराला सिलिगुडीतून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साळुंके विहार रोड येथील जश्न हॉटेलमधील तिजोरीतून 26 लाख 54 हजार रुपये व तीन लाख किमतीचे घड्याळ चोरून पसार झालेल्या नोकरासह त्याच्या साथीदाराला  पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 25 लाख 32 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद अश्फाक हुसैन आणि इकबाल इजराइल आलम … The post Crime News : हॉटेलमध्ये डल्ला मारणार्‍या नोकराला सिलिगुडीतून बेड्या appeared first on पुढारी.
#image_title

Crime News : हॉटेलमध्ये डल्ला मारणार्‍या नोकराला सिलिगुडीतून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साळुंके विहार रोड येथील जश्न हॉटेलमधील तिजोरीतून 26 लाख 54 हजार रुपये व तीन लाख किमतीचे घड्याळ चोरून पसार झालेल्या नोकरासह त्याच्या साथीदाराला  पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 25 लाख 32 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत.

मोहम्मद अश्फाक हुसैन आणि इकबाल इजराइल आलम ( वय 27, दोघे रा. जिन्नतपूर, गोल पोखेर धरमपूर उत्तर प्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 ऑक्टोबर रोजी वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साळुंखे विहार रस्त्यावरील जश्न हॉटेलच्या कार्यालयातील तिजोरीमधील तब्बल 26 लाख 54 हजारांची रोकड आणि 3 लाख रुपयांचे रोलॅक्स कंपनीचे घड्याळ चोरी झाले होते. या वेळी हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी मोहम्मद हुसैन हा देखील त्या दिवसापासून फरार झाल्याने त्याच्यावर संशय व्यक्त झाला होता. ही चोरी त्यानेच केल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दखल केला.

वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि अंमलदार अतुल गायकवाड यांना तांत्रिक विश्लेषणावरून हुसैन हा पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे पळून गेला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस फौजदार राजू रासगे, अंमलदार संदीप साळवे, राहुल माने अशी टीम तत्काळ सिलिगुडी येथे रवाना करण्यात आली. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने हुसैन याला अटक करण्यात आली. हुसैनच्या तपासात त्याला ही चोरी करण्यासाठी त्याचा साथीदार इक्बाल याने मदत केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर इकबाल यालाही अटक करण्यात आली.

त्याच्याकडून चोरी करण्यात आलेल्या रकमेपैकी 25 लाख 32 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. दोघांकडे अधिक केलेल्या तपासात दोघेही चांगले मित्र असून मोहम्मद हुसैन हा मागील चार वर्षांपासून जश्न हॉटेलमध्ये नोकरीस होता.  हॉटेलमधील व्यवहारावर तो पाळत ठेवून होता. 18 ऑक्टोबर रोजी त्यांनी हॉटेलमधील कार्यालयातील सर्व तिजोरी खाली करून पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी गाठले. अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याविरोधात  कारवाई करण्यात आली.

दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून हुसैन हा संबंधित हॉटेलमध्ये नोकरीस होता. तेथे काम करत असताना त्याने आपल्या मित्राच्या मदतीने ही चोरी केली होती. त्यानंतर दोघेही पश्चिम बंगाल येथे पसार झाले होते. आमच्या टिमने त्यांचा माग काढत त्यांना अटक करून 25 लाख 32 हजारांची रोकड जप्त केली आहे.

– संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी

हेही वाचा
Pune News : बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
व्हॉटस्अ‍ॅपमध्ये चॅटसाठी येणार ‘एआय’चे भन्नाट फिचर
भाजपच्या माजी आमदाराविरोधात त्यांच्याच मुलीने थोपटले दंड
The post Crime News : हॉटेलमध्ये डल्ला मारणार्‍या नोकराला सिलिगुडीतून बेड्या appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साळुंके विहार रोड येथील जश्न हॉटेलमधील तिजोरीतून 26 लाख 54 हजार रुपये व तीन लाख किमतीचे घड्याळ चोरून पसार झालेल्या नोकरासह त्याच्या साथीदाराला  पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 25 लाख 32 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद अश्फाक हुसैन आणि इकबाल इजराइल आलम …

The post Crime News : हॉटेलमध्ये डल्ला मारणार्‍या नोकराला सिलिगुडीतून बेड्या appeared first on पुढारी.

Go to Source