
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यूट्यूबर एल्विश यादव तुरुंगातून सुटल्यानंतर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने लाईमलाईटमध्ये राहिला आहे. कोर्टाने एल्विशला ५०-५० हजारांच्या बेल बॉन्डवर जामीन दिला आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एल्विशला अटक झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्या परिवारासोबत सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनासाठी गेला. त्याने आपल्या परिवारासोबत जो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Elvish Yadav)
एल्विश यादवने परिवारासोबत शेअर केला फोटो
यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादवने आपल्या परिवारासोबत एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय या फोटोमध्ये मनाला भावनारी एक कॅप्शनदेखील लिहिली आहे. सापाच्या विष प्रकरणी ५ दिवस तुरुंगामध्ये राहिल्यानंतर एल्विश यादवला जामीनावर सोडण्यात आले आहे. बाहेर आल्यानंतर एल्विश पुन्हा एकदा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाला आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये आजी-आजोबा दिसत आहेत. याआधी यूट्यूबर एल्विशने एक ब्लॉग आणि क्रिप्टिक पोस्ट देखील शेअर केली होती.
एल्विश यादवच्या कॅप्शनने वेधलं लक्ष
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्विश यादवने आपल्या परिवारासोबत जो फोटो शेअर केला आहे, त्यात भावूक कॅप्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पोस्टला कॅप्शन लिहिलीय, ‘माय बॅकबोन’.
एल्विश यादवने आपला पहिला ब्लॉग शेअर केला होता. ज्यामध्ये त्याची आई सुषमा यादव देखील दिसली होती. आता बुधवारी बिग बॉस ओटीटी २ ने आपल्या संपूर्ण परिवाराची एक झलक दाखवली, ज्यामध्ये त्यांचे आजी-आजोबा, आई-वडील, दीदी-जीजू आणि त्यांची मुलगी दिसत आहे.
अटक झाली होती एल्विश यादवला
एल्विश यादवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनाचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये एल्विश आपल्या मित्रांसोबत साथ मंदिरातील फोटो काढताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, सापाचे विष प्रकरणात एल्विश यादव मागील ५ दिवसापासून बक्सर तुरुंगात होता.
View this post on Instagram
A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)
Latest Marathi News एल्विश यादवने शेअर केला ‘तो’ फोटो, भावूक कॅप्शन अन्… Brought to You By : Bharat Live News Media.
