नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

नाशिक ः Bharat Live News Media वृत्तसेवा- जिल्ह्याचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. देशाच्या वायव्य भागाकडून येणाऱ्या उष्ण लहरींचा हा परिणाम आहे. गेल्या सात दिवसांपासून तापमान ३५ अंशांहून अधिक आहे. बुधवारी (दि. २७) नाशिकमध्ये मोसमातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा असाच कडाका राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Nashik Temperature)
देशाच्या वायव्य भागात गुजरात आणि दक्षिण राजस्थानमध्ये उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम राज्यातील धुळे, जळगाव नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे. जळगावमध्ये ४४ ते ४६ अंश सेल्सिअस तापमान झाले असून, धुळ्यामध्येदेखील असेच प्रमाण आहे. नाशिकमध्ये बुधवारी कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
शहरातील रस्ते, चौक ओस (Nashik Temperature)
मार्च महिन्यातच उन्हाने चाळिशी गाठली असल्याने शहरातील रस्ते, चौक ओस पडायला सुरुवात झाली आहे. तसेच शहरामध्ये सायंकाळच्या वेळी नागरिक घराच्या बाहेर पडत आहे. उन्हामुळे शीतपेय, ताक यांनादेखील मागणी वाढली आहे.
गेल्या सात दिवसांची आकडेवारी (Nashik Temperature)
तारिख- कमाल तापमान
२१ मार्च-३६.३ अंश सेल्सिअस
२२ मार्च-३६.९ अंश सेल्सिअस
२३ मार्च-३७.३ अंश सेल्सिअस
२४ मार्च-३६.८ अंश सेल्सिअस
२५ मार्च-३७.७ अंश सेल्सिअस
२६ मार्च-३८.३ अंश सेल्सिअस
२७ मार्च-३९.४ अंश सेल्सिअस
हेही वाचा :
Loksabha election : बारामती मतदारसंघासाठी सर्वाधिक मनुष्यबळ
‘आयकर’ प्रकरणी काँग्रेसला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीला शरद पवारांचे बळ?
Latest Marathi News नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.
