‘उजनी’वर फिशमाफियांचा कब्जा..

भिगवण : देशाचे व राज्याचे नेतृत्व करणार्‍या राजकीय मातब्बर नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात व मतदारसंघात उपलब्ध असणारा रोजगार काढून घेऊन निर्माण झालेली बेरोजगारी दिसायला तयार नाही. गेली 30 वर्षे पुनर्वसनांच्या प्रश्नासह उजनी प्रदूषण व मच्छीमारांच्या रोजगाराच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे पडले आहे. वाळू व फिशमाफियांनी उजनीवर कब्जा मिळवला असून, राजकीय नेते, सरकारी बाबू व गुन्हेगारांच्या अभद्र युतीने … The post ‘उजनी’वर फिशमाफियांचा कब्जा.. appeared first on पुढारी.

‘उजनी’वर फिशमाफियांचा कब्जा..

भरत मल्लाव

भिगवण : देशाचे व राज्याचे नेतृत्व करणार्‍या राजकीय मातब्बर नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात व मतदारसंघात उपलब्ध असणारा रोजगार काढून घेऊन निर्माण झालेली बेरोजगारी दिसायला तयार नाही. गेली 30 वर्षे पुनर्वसनांच्या प्रश्नासह उजनी प्रदूषण व मच्छीमारांच्या रोजगाराच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे पडले आहे. वाळू व फिशमाफियांनी उजनीवर कब्जा मिळवला असून, राजकीय नेते, सरकारी बाबू व गुन्हेगारांच्या अभद्र युतीने उजनीत अवैध धंद्यांनी चांगलेच बाळसे धरल्याने उजनी हे अलीकडच्या काळातील अवैद्य धंद्यांचे आता प्रमुख केंद्र बनले आहे.
विशेष म्हणजे येथे कायदा पायदळी तुडवत परराज्यांतील व परजिल्ह्यांतील लोकांना पाचारण करून हे अवैद्य धंदे राजरोसपणे चालवले जात आहेत. यामध्ये बेकायदेशीर वाळूचा उपसा, मांगूर मासे पालन व बेकायदा मासेमारी याचा प्रामुख्याने समावेश आहे. करोडो रुपयांच्या आर्थिक उलाढालीत अधिकार्‍यांना मलिदा मिळत असल्याने अवघ्या उजनीत ’अंधा कानून’ची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
प्रदूषणाने आधीच उजनी काळवंडून तिचा आक्रोश सुरू आहे. त्यात अवैद्य धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे हद्दीचा सर्वाधिक फायदा घेऊन या अवैध धंद्याला बाळसे चढले आहे. यास जलसंपदा, महसूल व पोलिस यंत्रणाही खतपाणी घालत असल्याने हे अवैद्य धंदे चांगलेच पोसले आहेत. यातून बेकायदा वाळूचा उपसा करणारे, बेकायदेशीर मासेमारी करणार्‍यांची दहशत, दादागिरी व मुजोरी सामान्यांच्या मुळावर उठली आहे.
राज्यात पंचगंगेनंतर सर्वाधिक प्रदूषित धरण म्हणून उजनीकडे पाहिले जाते. पिंपरी-चिंचवड, कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे रासायनिक पाणी व पुणेकरांचे मैलामिश्रित सांडपाणी थेट उजनीत सोडले जात असल्याने उजनी अशुद्ध पाण्याचे डबके बनले आहे. हे पाणी पिण्यास काय, पण वापरण्याजोगेही राहिले नसल्याचे देशासह परदेशातील जलतज्ज्ञ बेंबीच्या देठापासून गेली वीस वर्षे झाले ओरडून सांगत आहेत. उजनी एवढी मैली झाल्याने तिच्या स्वच्छतेच्या गप्पा मारणारे प्रत्येक सरकार उपाययोजनेच्या घोषणा करीत आहे व दुसर्‍या बाजूने अवैद्य धंद्याला पाठबळ देऊन तिचे लचके तोडले जात आहेत. उजनीच्या पाण्यामुळे आता कॅन्सर, मूतखडा, कावीळ, त्वचारोग अशा अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनावरांच्या गर्भधारनेवर परिणाम झाला आहे. शेतीही नापीक होताना दिसत आहे. मत्स्य प्रजननावर विपरीत परिणाम झाला आहे. मैलामिश्रित व रासायनिक पाण्यामुळे उजनीचा काठ आता खर्‍या अर्थाने दुखण्याचे मूळ कारण बनले आहे. (क्रमश:)
हेही वाचा

Gadchiroli : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
‘पुणे-नाशिक द्रुतगती’च्या भूसंपादनाला विरोध..
उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर न होणे वेदनादायी : सुप्रिया सुळे

Latest Marathi News ‘उजनी’वर फिशमाफियांचा कब्जा.. Brought to You By : Bharat Live News Media.