अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नेमाडे
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी जिल्हा अध्यक्षपदी असलेले उमेश नेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष. खा. सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने उमेश नेमाडे यांची रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी नेमाडे यांचे सहकार्य राहील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
यावेळी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री. ना. संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, रवींद्र नाना पाटील, गुणवंत नीळ उपस्थित होते.
हेही वाचा :
Pune News : बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी
बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा
The post अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नेमाडे appeared first on पुढारी.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी जिल्हा अध्यक्षपदी असलेले उमेश नेमाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष. …
The post अजित पवार गटाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी नेमाडे appeared first on पुढारी.