काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र (caste verification certificate) रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शनासह बर्वे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसला आणि माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का बसला आहे. (Loksabha Election … The post काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द appeared first on पुढारी.

काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र (caste verification certificate) रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शनासह बर्वे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेसला आणि माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का बसला आहे. (Loksabha Election 2024)
केदार समर्थक मनोहर कुंभारे बुधवारी भाजपवासी झाले. कालच काँग्रेसच्या प्रचाराचा सुनील केदार यांनी ग्रामीणमध्ये श्री गणेशा केला. आज त्यांना हा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आज अर्ज पडताळणीचा दिवस असून अर्ज पडताळणीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रश्मी बर्वे यांच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेत तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली आहे. बर्वे यांना लवकर न्याय मिळाल्यास काँग्रेस तर्फे त्यांचे पती शाम बर्वे यांचा अर्ज अधिकृत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३० मार्च रोजी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. (Loksabha Election 2024)
वंचित बहुजन आघाडीने भाजपचे शंकर चहांदे, काँग्रेसचे गेल्यावेळी रामटेकमधून उमेदवार असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये या दोघांना एबी फॉर्म दिले असल्याने आता नेमके कोण उमेदवार हे अॅड प्रकाश आंबेडकरच ठरविणार आहेत. दरम्यान, नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने आभार मानले आहेत.
हेही वाचा : 

काँग्रेसला आणखी एक धक्‍का! सावित्री जिंदाल यांचाही पक्षाला रामराम
तत्कालीन ठाकरे सरकारकडून हजार कोटींचा वाईन घोटाळा : सोमय्या
शिवसेना-सुनील तटकरे यांचे मनोमिलन होणार का?

Latest Marathi News काँग्रेसला धक्का; रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द Brought to You By : Bharat Live News Media.