तत्कालीन ठाकरे सरकारकडून हजार कोटींचा वाईन घोटाळा : सोमय्या

मुंबई : तत्कालीन ठाकरे सरकारने महाराष्ट्र वाईन धोरण राबऊन एक हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात असलेल्या वाईन कंपनीच्या संचालकपदी संजय राऊत यांची कन्या असल्याचेही सोमय्या म्हणाले. 26 एप्रिल 2021 रोजी तत्कालीन ठाकरे सरकारने वाईन धोरणात सुधारणा केली आणि वाईनला मद्य विरहीत मानद त्याची विक्री किरकोळ दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये करण्यास परवानगी दिली. त्यानंतर हा घोटाळा झाल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
Latest Marathi News तत्कालीन ठाकरे सरकारकडून हजार कोटींचा वाईन घोटाळा : सोमय्या Brought to You By : Bharat Live News Media.
