काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम हे बंडाच्या तयारीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना(ठाकरे) गटाने मुंबई उत्तर पश्चिमसाठी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेल्यावेळेस या जागेवर काँग्रेसकडून निवडणूक लढलेले काँग्रेस नेते व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आठवडाभरात आपल्याला ही जागा न मिळाल्यास वेगळ्या पर्यायांचा विचार करू, असा इशाराच निरूपम यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिला आहे. संबंधित … The post काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम हे बंडाच्या तयारीत appeared first on पुढारी.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम हे बंडाच्या तयारीत

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा :  शिवसेना(ठाकरे) गटाने मुंबई उत्तर पश्चिमसाठी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेल्यावेळेस या जागेवर काँग्रेसकडून निवडणूक लढलेले काँग्रेस नेते व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आठवडाभरात आपल्याला ही जागा न मिळाल्यास वेगळ्या पर्यायांचा विचार करू, असा इशाराच निरूपम यांनी काँग्रेस श्रेष्ठींना दिला आहे.
संबंधित बातम्या 

ईडीची धाड पडते म्हणून हृदयपरिवर्तन नको! : सरसंघचालक मोहन भागवत
मार्च एन्ड! सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्रे सुरूच राहणार
Lok Sabha Election 2024 | चिकोडी : मंत्री कन्या की जोल्ले पुन्हा?

निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वावर टीका केली. तसेच, मुंबईत काँग्रेसला दाबून टाकण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला. 2019 ला निवडणूक हरल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. परंतु, शिवसेनेने आम्हाला दाबले. कमी जनाधार असलेल्या शिवसेनेसारख्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणे हे काँग्रेसची श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झालाय, असे दिसतेय, असेही ते म्हणाले.
निरूपम शिवसेनेच्या (शिंदे) गटाच्या संपर्कात असून ते शिंदे गटात प्रवेश करू शकतात,अशी चर्चा ही आहे. शिंदे गटाकडेही या जागेसाठी भक्कम उमेदवार नसल्याने निरूपम यांचाही येथील उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो, असेही संकेत आहेत.
Latest Marathi News काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम हे बंडाच्या तयारीत Brought to You By : Bharat Live News Media.