ब्ल्यू मोनोकिनीमध्ये स्विमिंग पुलाशेजारी, जयपूरमध्ये भूमी घेतेय सुट्टीचा आनंद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भक्षक चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर चित्रपट ‘भक्षक’ मुळे चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. समीक्षकांनी ‘भक्षक’ आणि भूमीच्या (Bhumi Pednekar) अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. दरम्यान, भूमी पडेणेकर जयपूरमध्ये पोहोचली. तेथून तिने एक हॉट फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून फॅन्सनी अक्षरश: कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Bhumi Pednekar)
जयपूरमध्ये भूमी एका स्विमिंग पुलाच्या काठी रिलॅक्स खूर्चीवर ब्ल्यू मोनोकिनीमध्ये पहुडलेली दिसते. तिने डोळ्यांवर काळा गॉगल घातलेला दिसतो. भूमीने मोकळे केस सोडले असून तिने कॅप्शनमध्ये It’s not a vacay, it’s a WORKAY 🌻 #Jaipur असे लिहिले आहे.
नुकताच भूमीचा पहिला चित्रपट ‘दम लगा के हईशा’ ला ९ वर्षे पूर्ण झाली. यश आणि प्रतिक्रिया देत भूमीने म्हटलं की, ‘भक्षकचे यश मला माझ्या हिट चित्रपटाची आठवण करून देतो. मला माझ्या पहिल्या चित्रपटाच्या यशावेळी जो अनुभव आला, तसाच अनुभव आता येत आहे. मी खरंच खूप खुश आहे.’
View this post on Instagram
A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)
View this post on Instagram
A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)
Latest Marathi News ब्ल्यू मोनोकिनीमध्ये स्विमिंग पुलाशेजारी, जयपूरमध्ये भूमी घेतेय सुट्टीचा आनंद Brought to You By : Bharat Live News Media.
