
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचे तिकिट नाकारल्यामुळे किटकनाशक प्राशन केलेले इरोड येथील मारूमालार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए गणेशमूर्ती यांचे आज (दि.२८ मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २४ मार्च रोजी गणेशमूर्ती यांनी टोकाचे पाऊल उचलत कीटकनाशक करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कोईम्बतूरमधील येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
२४ मार्च रोजी सकाळी ७६ वर्षीय गणेशमूर्ती यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या होऊ लागल्या. कीटकनाशक प्राशन केले असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यांना तत्काळ इरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले होते. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
गणेशमूर्ती यांनी 1998 मध्ये पलानी आणि 2009 मध्ये इरोडमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर गणेशमूर्ती 2019 च्या लोकसभा निवडणुकीत इरोड लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते . त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
#WATCH | Tamil Nadu: MDMK MP from Erode, Ganesamoorthy passed away at 5:05 am today due to cardiac arrest. He was hospitalised on March 24 after allegedly attempting suicide.
Visuals from the hospital in Coimbatore as his body is being brought out. pic.twitter.com/1dQswss4uG
— ANI (@ANI) March 28, 2024
On the demise of Ganesamoorthy – MDMK MP from Erode – party founder Vaiko says, “He was happy with the seat (party ticket) issue. He met me twice. We never expected him to make such a decision. He was in a good mood. I cannot believe that he took such a step and passed away. We… https://t.co/w7PW0k95t2 pic.twitter.com/6PpGNA5S5B
— ANI (@ANI) March 28, 2024
गणेशमूर्ती यांच्या निधनावर एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी शाेक व्यक्त केला आहे. पक्षाचे तिकीट वाटपानंतर ते दोनवेळा मला भेटले होते. त्यावेळी असे वाटले नाही ते असा टोकाचे पाऊल उचलले. त्यांचे निधन झाले यावर माझा विश्वास बसत नाही, असे वायकाे यांनी म्हटलं आहे.
Latest Marathi News ‘राजकारण’ जीवावर बेतले..! तिकीट नाकारल्याने कीटकनाशक प्राशन केलेल्या खा. गणेशमूर्तींचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
