
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गणेशशिंड रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारी महावितरणची इमारत महापालिकेच्या पथविभागाने एका रात्रीत जमीनदोस्त केली आहे. यामुळे या रस्त्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. यासाठी बालेवाडीपासून सिमला ऑफिसपर्यंत पिलर उभारणीसाठी मोठी खोदाई केलेली आहे. तसेच या रस्त्याच्या मधोमध नऊ मीटरचा भाग बॅरिकेड्स लावून बंदीस्त केला. त्यामुळे या अरुंद रस्त्यावर वाहनांना ये-जा करताना अडथळा होता. शिवाय वाहतुक कोंडी होते.
या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता 45 मीटर करण्याच्या अनुषंगाने रस्त्यावरील विविध मिळकतींचा ताबा घेणे व रुंदीकरण करणे, ही कामे महापालिकेकडून हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या पथविभागाने गणेश खिंड रस्ता आणि सेनापती बापट रस्ता जंक्शनवर (विद्यापीठ चौक) असणारी महावितरणची इमारत ताब्यात घेऊन मंगळवारी मध्यरात्री जॉ-कटरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई पथ विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, कार्यकारी अभियंता दिलीप पावरा, उप अभियंता मनोज गाठे यांच्यासह मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : सोलापूर : दुरंगी की तिरंगी
राज आत्मसमर्पण करतील?
Lok Sabha Election 2024 : देशभरातील ‘टॉप टेन’ लढती
Latest Marathi News पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ‘महावितरण’चा अडथळा दूर.. Brought to You By : Bharat Live News Media.
