
शिरूर : शंकर भालेकर : धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडचा पायी दिंडी सोहळा आज महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण काशीकडे निघाला असून, या दिंडी सोहळ्यामध्ये टाळ मृदंगाचा गजर भानुदास एकनाथाचा जयघोष तीव्र उन्हाच्या उष्णतेमध्ये भक्तीचा गारवा निर्माण करून दिंडी सोहळ्याने मोठ्या आनंदाने पैठण कडे प्रस्थान केले आहे.
मराठवाड्यामध्ये ज्या सोहळ्याला वारकरी संप्रदायाला तो श्री क्षेत्र पैठण येथील षष्ठीचा सोहळा चार दिवसावर आले. बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाला नाथ षष्ठी निमित्त पैठणच्या यात्रेला येण्याची वेध लागले आहे.धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नारायण गड येथून गेल्या अनेक वर्षापासून नाथ षष्ठी निमित्त पायी दिंडी सोहळा जात असून, या सोहळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भाविक भक्त सहभागी होऊन टाळ मृदंगाचा गजर करत भानुदास एकनाथाचा जयघोष दक्षिण काशीच्या दिशेने म्हणजेच श्री क्षेत्र पैठण नगरी कडे आज प्रस्थान केले आहे. महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेला हा सोहळा श्री नगद नारायण महाराजांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून पहिले मुक्कामी म्हणजे शिरूर तालुक्यातील शिरापूर गात या गावाच्या दिशेने निघाला. सोहळ्यामध्ये झेंडेकरी , हंडेकरी, तुळशीवाले, टाळकरी या सोहळ्याची मोठी शोभा वाढवत आहेत. सायंकाळी 6:30 च्या दरम्यान आज सोहळा शिरापूर गात येथे पोहोचल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याला पंगती देण्यात आली. या ठिकाणी कीर्तनाचाही कार्यक्रम होणार असल्याचे आले आहे. शिरापू गात, बाटगव्हाण, सायगव्हाण असे रस्त्यामध्ये तीन मुक्काम केल्यानंतर मुक्कामी पैठणला पोहोचणार आहे. या सोहळ्यामध्ये पंचक्रोशीतून हजारो भाविक भक्त सहभागी झाल्यामुळे या सोहळ्याला मोठे व्यापक रूप आले.
गुरुदेवांची परंपरा वाढवणे आमचे कार्य
धाकटी पंढरी श्री. क्षेत्र नारायण गड येथून गुरुवर्य महंत वै.महादेव महाराज यांनी श्री.क्षेत्र पंढरपूर व श्री क्षेत्र पैठण या दोन्ही ठिकाणी वर्षातून दोन वेळा पायी दिंडी सोहळा काढून पंचक्रोशीतील भाविक भक्तांना एकत्रित करून गुण्या गोविंदाने नांदायची शिकवले. त्याच परंपरेचे आम्ही पाईक म्हणून हा दिंडी सोहळा मोठ्या थाटाने दरवर्षी पैठण कडे घेऊन जात असतो याही वर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. या सोहळ्याची व्यापकता वाढावी व परंपरा अखंडित चालावी ही यासाठी सदैव आम्ही तत्पर राहू अशी प्रतिक्रिया शिवाजी महाराजांनी यांनी दिली आहे.
Latest Marathi News नारायणगडाची भगवी पताका निघाली दक्षिण काशीला; ‘भानुदास एकनाथा’चा जयघोष करत दिंडीचे पैठणकडे प्रस्थान Brought to You By : Bharat Live News Media.
