वाशिम नगरपरिषदेकडून शहरात दूषित पाणीपुरवठा

वाशिम; Bharat Live News Media वृत्तसेवा : वाशिम नगर परिषद पाणी पुरवठा विभाग सद्या शहरात दूषित पाणी पुरवठा करून शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचे दिसून येत आहे.वाशीम नगर परिषदे मध्ये कोट्यावधीची जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरत असून नगर परिषदेच्या नळाला संपूर्ण शहरात अशा पद्धतीचं पूर्ण पिवळं पाणी येत आहे. आधीच आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना आता हा दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वाशिम नगरपरिषद नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचं दिसून येत आहे, यावर जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासन मूग गिळून बसले असल्याने शहरातील नागरिकांचा नगर परिषदे विरुद्ध रोष पसरत आहे. यावर तात्काळ दखल घेऊन हा दूषित पाणी पुरवठा बंद करण्यात येऊन शुद्ध पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
Latest Marathi News वाशिम नगरपरिषदेकडून शहरात दूषित पाणीपुरवठा Brought to You By : Bharat Live News Media.
