कल्याण लोकसभा : श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाची मोठी खेळी; शरद पवार गटाचे वंडरशेठ पाटील उमेदवार?

कल्याण; Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. युतीतील तिन्ही घटकपक्षांत काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. काही जागांवर मात्र भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून ठाकरेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आपले काही उमेदवार ठरवलेले आहेत. यामध्ये कल्याणच्या जागेचाही समावेश आहे. महायुती कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे यांना तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
सुधीर पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट) ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. क सुशिक्षित, युवा, कार्यक्षम, आगरी चेहरा, सामान्यांची जाण असणारे उमेदवार म्हणून सुधीर पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. सुधीर पाटील यांच्या नावाला लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे.
Latest Marathi News कल्याण लोकसभा : श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाची मोठी खेळी; शरद पवार गटाचे वंडरशेठ पाटील उमेदवार? Brought to You By : Bharat Live News Media.
