नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी; असंतुष्ठांच्या नागपुरात बैठका

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: महायुतीत शिवसेना-भाजप आणि प्रहार संघटनेचा प्रचंड विरोध असताना विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आज (दि.२७) रात्री १०.३० वाजता नागपूरला आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी निवासस्थानी भाजप प्रवेश होणार आहे. Navneet Rana
विशेष म्हणजे राणा दाम्पत्याने यापूर्वीच कमळ चिन्हासह मेळघाटपासून प्रचारही सुरू केला. अमरावती मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपचे तिकीट देऊ नये, अशी मागणी भाजपमधून जोरात पुढे आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी अमरावती येथून अनेक दमदार इच्छुकांसह तगडे शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले. Navneet Rana
कोराडीत बावनकुळे यांच्याकडे सुमारे तासभर चर्चेतून राणा यांना तीव्र विरोध करण्यात आला. फडणवीस यांचीही भेट झाली. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच नेतृत्वाने राणा यांनाच कौल दिला. आमदार बच्चू कडू यांनी देखील खासदार राणा यांना विरोध करीत प्रहारचा उमेदवार उभा केला जाईल, असा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील का ? यावर सारा खेळ आहे.
दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांचे नामांकन भरण्यासाठी आले असता त्यांनी यवतमाळ- वाशिम मतदार संघातील उमेदवारी संदर्भात कॅबिनेट मंत्री संजय राठोड, उदय सामंत यांच्याशी चर्चा केली. राठोड येथून प्रबळ दावेदार आहेत. तर दुसरीकडे विद्यमान खासदार भावना गवळी यांनी आपण हा मतदारसंघ कदापीही सोडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार गवळी यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी निवडणूक होत असलेल्या अमरावती आणि यवतमाळ- वाशिम मतदार संघाचा तिढा लवकरच सुटेल का ? हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा
Ramtek Lok Sabha | नागपूर: रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे, गजभिये यांचे अर्ज दाखल
नागपूर: मुलगा, बहिणीसह ५ जणांची हत्या; क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशी कायम
नागपूर : राजूरवाडी तांड्यावर कौटुंबिक वाद, व्हायरल व्हिडिओने खळबळ
Latest Marathi News नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी; असंतुष्ठांच्या नागपुरात बैठका Brought to You By : Bharat Live News Media.
