सुप्रिया श्रीनेत, दिलीप घोष यांना निवडणूक आयोगाची नाेटीस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरोधात अपमानास्पद, आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत आणि भाजपचे नेते दिलीप घोष यांना कारणे दाखवा नोटीस बजावली केली आहे. या प्रकरणी दोघांनाही २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कंनगा राणावत यांच्याविरोधात सोशल मीडियावर सुप्रिया नेत यांनी अपमानास्पद पोस्ट केली होती. मात्र आपलं एक्स हँडेल कोणतरी हॅक करुन ही पोस्ट केल्याचा दावा त्यांनी केला होता.
वर्धमान-दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची खिल्ली उडवली होती.
सुप्रिया श्रीनेत आणि दिलीप घोष यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीची आता निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही नेत्यांना नोटीस बाजवत २९ मार्चपर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
Election Commission of India issues show cause notices to BJP MP Dilip Ghosh and Congress leader Supriya Shrinate for their remarks against West Bengal CM Mamata Banerjee and BJP’s Lok Sabha candidate Kangana Ranaut respectively. pic.twitter.com/451FoJUP8I
— ANI (@ANI) March 27, 2024
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्र्यांंसह मंत्र्यांची मुले भिडणार
Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक ठरणार जगात सर्वात महागडी ?
Latest Marathi News सुप्रिया श्रीनेत, दिलीप घोष यांना निवडणूक आयोगाची नाेटीस Brought to You By : Bharat Live News Media.
