‘या’ २५ स्टॉक्समध्ये २८ मार्चपासून T+0 सेटलमेंट सुरु होणार, BSE ने दिली यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात २८ मार्चपासून T+0 ट्रेड सेटलमेंट प्रणाली सुरु होणार आहे. त्यासाठी आज बुधवारी (दि.२७) बीएसईने यासाठी पात्र २५ स्टॉक्सची यादी जाहीर केली. ज्यात T+0 सेटलमेंट सुरु होईल. यात अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, बीपीसीएल, सिप्ला, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एमआरएफ, वेदांता आणि टाटा … The post ‘या’ २५ स्टॉक्समध्ये २८ मार्चपासून T+0 सेटलमेंट सुरु होणार, BSE ने दिली यादी appeared first on पुढारी.
‘या’ २५ स्टॉक्समध्ये २८ मार्चपासून T+0 सेटलमेंट सुरु होणार, BSE ने दिली यादी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात २८ मार्चपासून T+0 ट्रेड सेटलमेंट प्रणाली सुरु होणार आहे. त्यासाठी आज बुधवारी (दि.२७) बीएसईने यासाठी पात्र २५ स्टॉक्सची यादी जाहीर केली. ज्यात T+0 सेटलमेंट सुरु होईल. यात अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, बजाज ऑटो, बँक ऑफ बडोदा, बीपीसीएल, सिप्ला, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, एलआयसी हाऊसिंग फायनान्स, एमआरएफ, वेदांता आणि टाटा समुहाच्या शेअर्सचा समावेश आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, बाजार नियामक सेबीने पर्यायी आधारावर T+0 ट्रेड सेटलमेंट सायकलचे बीटा व्हर्जन सादर करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार केले होते.
सध्या भारतीय शेअर बाजारातील सर्व शेअर्सचे व्यवहार T+1 सेटलमेंट सायकलवर चालतात. याचा अर्थ शेअर्सची खरेदी आणि विक्री व्यवहार एक दिवसानंतर गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यांमध्ये दिसून येतो. तर T+0 चा अर्थ असा की त्याच दिवशी सेटलमेंट होईल आणि इन्स्टंट सेटलमेंट हे सुनिश्चित करेल की व्यवहार लगेच सेटल केले जातील. म्हणजेच शेअर्स विकताच लगेच अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. (Stock Market T+0 Settlement)
सुरुवातीला, हा पर्याय २५ शेअर्ससाठी आणि मर्यादित संख्येने ब्रोकर्ससाठी उपलब्ध असेल. हा पर्याय इक्विटी कॅश बाजारातील विद्यमान T+1 सेटलमेंट सायकलच्या अतिरिक्त म्हणून काम करेल.
सेबीने म्हटले आहे की हे एक छोटे सेटलमेंट सायकल खर्च आणि वेळेमध्ये कार्यक्षमता आणेल तसेच गुंतवणूकदारांच्या शुल्कात पारदर्शकता आणेल आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि एकूण सिक्युरिटीज मार्केट इकोसिस्टममध्ये जोखीम व्यवस्थापन मजबूत करेल. इन्स्टंट सेटलमेंट प्रणाली लागू करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे बाजारात तरलता वाढवणे हा आहे. तसेच निधी थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याने ते गुंतवणूकदारांचे संरक्षण मजबूत करेल.
T+0 म्हणजे त्याच दिवशी सेटलमेंट. सेटलमेंट सायकल २००२ मध्ये T+5 वरून T+3 आणि त्यानंतर २००३ मध्ये T+2 पर्यंत आणण्यात आले होते. पुढे २०२१ मध्ये T+1 सेटलमेंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. जे जानेवारी २०२३ पासून पूर्णपणे लागू करण्यात आले होते.
 हे ही वाचा :

RIL मधील खरेदीमुळे बाजारात तेजीचा माहौल, गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फायदा
मारुती सुझुकीची ‘हनुमान उडी’ : बाजारमूल्य पोहोचले ४ लाख कोटींवर
री बॅलेन्सिंग’ प्रत्येक पोर्टफोलिओत का आहे गरजेचे?

 
Latest Marathi News ‘या’ २५ स्टॉक्समध्ये २८ मार्चपासून T+0 सेटलमेंट सुरु होणार, BSE ने दिली यादी Brought to You By : Bharat Live News Media.