रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे,गजभिये अर्ज दाखल

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसतर्फे रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता शिवसेना विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आज शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. Ramtek Lok Sabha काँग्रेसतर्फे आपल्याला माहिती देण्यात आली नाही, विश्वासात घेतले गेले … The post रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे,गजभिये अर्ज दाखल appeared first on पुढारी.

रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे,गजभिये अर्ज दाखल

नागपूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या या परंपरागत मतदारसंघात काँग्रेसतर्फे रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आता शिवसेना विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आज शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. Ramtek Lok Sabha
काँग्रेसतर्फे आपल्याला माहिती देण्यात आली नाही, विश्वासात घेतले गेले नाही. भीमशक्ती, शिवशक्तीच्या बाळावर माझा विजय निश्चित असून कुठल्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही. आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे असून हा परंपरागत शिवसेनेचा मतदार संघ असल्याचे  साखरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. Ramtek Lok Sabha
दरम्यान, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी देखील वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लवकरच अर्ज भरणार असल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी गजभिये यांनी आपण काँग्रेसचेच पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असून वेळप्रसंगी रश्मी बर्वे यांचा अर्ज जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आला. तर आपल्याला पक्षाने एबी फॉर्म द्यावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आज त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीची अडचण होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे माजी मंत्री सुनील केदार गटाचे निष्ठावंत मनोहर कुंभारे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रित मोट कशी बांधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 मार्चरोजी या मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. महायुतीत विद्यमान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापून काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांच्या हाती भगवा झेंडा सोपविण्यात आला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत राजू पारवे यांनी आज नामांकन दाखल केले.  यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले. पहिल्या टप्प्यातील पाचही जागी महायुतीचे सर्व उमेदवार निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार कृपाल तुमाने यांना  मोठी जबाबदारी दिली जाईल. त्यांच्या मार्गदर्शनात हा मतदारसंघ पुन्हा महायुती जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. एकंदरीत महायुतीत शिवसेना आणि भाजपातील अंतर्गत धुसफूस तसेच महाविकास आघाडीत तिकीट वाटपावरून असलेल्या असंतुष्टांची नाराजी यात’ डॅमेज कंट्रोल’ करण्यात कोणाला यश मिळते, यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
हेही वाचा 

Akola West assembly : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द: उच्च न्यायालयाचा निर्णय
नागपूर: मुलगा, बहिणीसह ५ जणांची हत्या; क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशी कायम
Nagpur Lok Sabha : नागपुरात भाजपचे शक्तिप्रदर्शन: गडकरी, पारवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल 

Latest Marathi News रामटेकमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! साखरे,गजभिये अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.